महत्वाच्या बातम्या
-
Vinayak Mete Passes Away | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण कार अपघातात शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचं निधन
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं भीषण कार अपघातात निधन झालं. विनायक मेटे यांची कार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटे साडेपाच वाजता दुर्घटनाग्रस्त झाली. यात विनायक मेटे यांच्यासह दोघे जखमी झाले होते. एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
2 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत - विनायक मेटे
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या विषयी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या कि ‘ आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, निवडून आलेल्यांना आम्ही शुभेच्छा देतो’, मात्र अद्यापही प्रीतम मुंडे कुठेही समोर आलेल्या नाहीत. या नंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त असून ७७ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | सुप्रीम कोर्टाने आरसा दाखवला | मोर्चे काढून वातावरण गढूळ करणारे भाजप नेते पलटले
मराठा आरक्षणाबाबत सर्वाेच्च न्यायालयाने मे महिन्यात सुनावलेल्या निकालात १०२ व्या घटनादुरुस्तीच्या व्याख्येला आव्हान देणारी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने गुरुवारी म्हटले की, “केंद्राच्या याचिकेवर विचार करण्यासाठी कोणताही पुरेसा आधार नाही. त्यातील उपस्थिती मुद्द्यांवर मुख्य निकालात घटनापीठाने विचार केला होता. याचिकेत दिलेल्या विविध आधारांचा मुख्य निकालातच निपटारा करण्यात आला आहे.’
4 वर्षांपूर्वी -
शिवसैनिकांसमोर आवाज न करता शांत बसलेले मेटे शिवसैनिक गेल्यावर पत्रकार परिषदेत गरजले.... काय म्हणाले?
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक सुरु होती. मात्र, या बैठकीत अचानक गदारोळ सुरु झाला. काही तरुण अचानक बैठकीत आले. त्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. ते विनायक मेटे यांच्याजवळ आले. भाजप सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल या तरुणांनी केला. या तरुणांनी ही बैठक उधळून लावली.
4 वर्षांपूर्वी -
बीडमध्ये शिवसंग्रामला धक्का | बडे नेते विनोद हातांगळे यांच्यासह १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत
बीडमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. काका- पुतण्याच्या राजकीय युद्धात आता शिवसंग्रामला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवसंग्रामच्या एका बड्या नेत्याला फोडल्याने बीडमधील राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसंग्रामचे विनोद हातांगळे यांच्यासह तब्बल १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्याने शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
विनायक मेटे साहेब फोर्ड गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन | आता उधारी द्या | जाहिरातच छापली
उधारीचा पर्याय हा अनेक उद्योगांच्या डबघाईला जाण्याचं कारण ठरतो. त्यात राजकीय नेत्यांवर भरोसा ठेऊन उधारीने उद्योग रेटने म्हणजे विषाचीच परीक्षा घेण्यासारखं आहे. तसाच एक उदाहरण समोर आलं असून, राजकीय नेत्यांसोबत कधीही उधारी करून व्यवसाय करू नये असंच तुम्ही देखील म्हणाल.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समन्वय समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा | मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण न्यायालयात महाविकास आघाडी सरकारकडून बाजू मांडली जाताना दिसत नाही. तर आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे आहेत. मात्र त्यांनी आजवर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांना या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी मराठा आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समन्वय समितीची बैठक आज पुण्यात पार पडली, या बैठकीनंतर ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यास सरकारने नकार दिल्याने विनायक मेटेंचा संताप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले असून, आता अधिवेशन ०७ सप्टेंबर २०२० रोजी बोलाविण्यात येईल, असा निर्णय आज विधान भवन मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी राजभवनमधील २४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेनं तातडीनं उपाययोजना राबवल्या आहेत. येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणार्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलले गेले आहे. तत्पूर्वी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी होणार होते. मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलून ३ ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरले होते.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या भूमिकेने विनायक मेटे, सदाभाऊ खोत आणि मेटेंच्या राजकारणाला यु-टूर्न?
भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या स्वतःच्या पक्षाला विसरून भाजपचे अघोषित प्रवक्ते होण्यास भाग पाडलं होतं. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, स्वतःचे पक्ष विसरून भाजपाच्यामागे फरफटत गेले आणि आज त्यांच्या कार्यकर्त्यांना भविष्य आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मित्रपक्ष: भाजपने मेटेंचं राजकीय अस्तित्व संपवलं; चौथा समर्थक जिल्हा परिषद सदस्य सुद्धा भाजपात
बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यातील सख्य संपूर्ण राज्याला माहित आहे. जिल्हा परिषदेतील कारभाराच्या तक्रारींवरुन मेटेंनी मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावले आणि पुन्हा मेटे-मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला. आता हाच राजकीय दुरावा बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा पुढचा अंक ठरवणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
काहीच वाच्यता न करता भाजपने अप्रत्यक्षरीत्या काही सहकारी पक्ष नेत्यांसकट हॅक केले? सविस्तर
भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या हॅक केले आहेत, असंच म्हणावं लागेल. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण त्यातीलच म्हणावे लागतील.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण - सद्भावना यात्रा २०१६ मेटे व अजित पवार
मराठा आरक्षण – सद्भावना यात्रा २०१६ मेटे व अजित पवार
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC