Voda Idea 5G Trials | 5G स्पीड ट्रायलमध्ये व्होडा-आयडियाचा प्रति सेकंद 5.92 जीबीचा दावा | हाय स्पीड डाऊनलोड
दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्या व्होडाफोन आयडिया आणि एरिक्सन यांनी 5 जी चाचणीत नवीन तंत्रज्ञानाचा टप्पा गाठल्याचा दावा केला आहे. या चाचणीत वोडा-आयडिया आणि एरिक्सन यांनी जास्तीत जास्त 5.92 जीबी प्रतिसेकंद डाउनलोड स्पीड मिळवण्याची घोषणा केली आहे. हा डाऊनलोड स्पीड गाठणं किती मोठा मैलाचा दगड आहे, हे तुम्ही समजू शकता की या स्पीडमध्ये 1 जीबीचे 10 व्हिडिओ 15 सेकंदांपेक्षा कमी वेळात डाऊनलोड होतील. वेगाचा हा नवा टप्पा वोडा-आयडियाने एकाच चाचणी उपकरणावर गाठला असून 5 जी चाचणी महाराष्ट्रातील पुणे येथे झाली.
3 वर्षांपूर्वी