VR Films Share Price | कमाईची संधी! व्हीआर फिल्म्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड तारीखपूर्वी गुंतवणूक करून फायदा घ्या
VR Films Share Price| व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनी आपल्या शेअर धारकांना 7 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या शेअरधारकांना प्रत्येक शेअरवर सात बोनस शेअर्स मोफत देणार आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.49 टक्के वाढीसह 400.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी