Waaree Share Price | 8 रुपयाचा शेअर ठरला आयुष्य बदलणारा, 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर दिला 1.38 कोटी रुपये परतावा, स्टॉक डिटेल्स
Waaree Renewable Share Price | वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 13,000 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 जुलै 2020 रोजी या सौर पॅनेल बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स 8.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 4 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 1135.60 रुपयेवर पोहचला आहे. वारी रिन्युएबल कंपनीच्या स्टॉकमध्ये तीन वर्षांपूर्वी 1 लाख रुपये लावणाऱ्या लोकांना 1.38 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. 28 जून 2023 रोजी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1174.50 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 जुलै 2022 रोजी कंपनीच्या शेअरने 290.10 रुपये 52 आठवड्यांची नीचांक पातळी स्पर्श केली होती. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 1,127.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी