महत्वाच्या बातम्या
-
ममता प. बंगालमध्ये भाजपला भुईसपाट करतील अशी भीती? | प. बंगाल भाजपमध्ये अचानक पक्षांतर्गत खांदेपालट
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भवानीपूर मधील पोटनिवडणूक जवळ आली असताना भाजपने राज्य पातळीवर संघटनात्मक मोठा बदल केला आहे. प्रदेशाध्यक्षपदी सुकांत मुजुमदार यांची निवड करण्यात आली असून पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची बढती देऊन त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. भाजपमधून होणारी पडझड रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजपचे कालिगंजचे आमदार सौमेन रॉय यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे कालिगंजमधील भाजपचे आमदार सौमेन रॉय यांनी पक्षाला निरोप देतानाच ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. सौमेन यांनी या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कालीगंज मतदारसंघातून तृणमूल उमेदवार तपन देब सिंघा यांचा 94,948 मतांनी पराभव केला होता.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजपमधील अंतर्गत वाद पेटला, प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा गोंधळ
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आमदार, खासदार, पदाधिकारी ते कार्यकर्ते सर्वच असंतुष्ट असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ममता बॅनर्जींचं राजकीय वजन वाढल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोण मोदी? कारण पश्चिम बंगालमध्ये ओन्ली दीदी... तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत
पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? आज हे चित्र स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकीकडे करोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Exit Poll 2021 | पश्चिम बंगालमध्ये ममता राज, तर तामिळनाडूत एनडीए'ला धक्का देत DMK सुसाट जाणार
पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी आठव्या टप्प्यातील मतदानासोबतच ५ राज्यांच्या निवडणुकांची सांगता झाली. निकालांसाठी २ मेची वाट पाहावी लागेल. कारण, गुरुवारी मतदानानंतर समाेर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्येही निकालांवर एकमत नाही. ४ माेठ्या संस्थांच्या पोलपैकी २ पोल ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला, तर एका एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमताचा अंदाज आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने तर दोन्ही पक्षांना जवळपास सारख्या जागा देत दोघांनाही बहुमत दर्शवले आहे. म्हणजे बंगालच्या मतदारांनी यंदा एक्झिट पोल संस्थांकडेही आपली ‘मन की बात’ सांगितलेली नसल्याचे दिसते. खरा निकाल २ मे रोजीच लागणार आहे. भाजप व तृणमूलने एक्झिट पोल्स आपल्याच बाजूने असल्याचा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिन्ही मोठ्या राज्यांमध्ये भाजपचा मोठा पराभव होणार | विधानसभा निवडणूकपूर्व सर्व्हे
देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं पानीपत होताना दिसत आहे. टाइम्स नाऊ आणि सी-व्होटरच्या सर्व्हेनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार येणार असून तामिळनाडूत काँग्रेस आघाडीची सत्ता येणार आहे. तर केरळात पुन्हा एकदा डाव्यांचंच पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे या तिन्ही मोठ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाला समोरे जावे लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगाल निवडणूक | भाजपकडे उमेदवारांचा अभाव | फिल्मी कलाकारांच्या प्रवेशाचा सपाटा
२०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी जेव्हा सीपीएमची गेल्या ३४ वर्षांपासून असलेली सत्ता उलथवून दिली, तेव्हा त्यांना बंगालमधील सेलिब्रिटींचे खूप पाठबळ मिळाले. यामध्ये खासकरून टॉलीवूडच्या या सेलिब्रिटींचा समावेश होता, ज्यांनी राज्यात बदल घडवून आणण्याचे आवाहन जनतेला केले हाेते. आता ममतांच्याच पावलावर पाऊल टाकत भारतीय जनता पक्षाचीही सेलिब्रिटींचा पाठिंबा घेण्याची इच्छा आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजपाची भव्य सभा आणि जनसागर | मात्र हवा निर्मितीसाठी तेच जुनं 'तंत्र'?
पश्चिम बंगालमधील अनेक नेते, अभिनेते, खासदार आणि आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण जोर लावण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बंगाल सर करण्यासाठी भाजपने कोणतीही कसूर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून झारखंडच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनाही बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल