Westlife Foodworld Share Price | पिझ्झा-बर्गर खाण्यापेक्षा तो विकणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, 69000 रुपयांवर 1 कोटी रुपये परतावा दिला
Westlife Foodworld Share Price | ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ या फास्ट फूड रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीचे शेअर कमालीच्या तेजीत वाढत आहेत. काल हा स्टॉक NSE निर्देशांकावर 7.35 टक्के वाढला होता. तर आज गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ या कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के वाढीसह 723.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ज्या लोकांनी 11 वर्षापूर्वी ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ कंपनीच्या शेअरमधे 69 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1 कोटी रुपये झाले आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमतवरून 9 टक्के अधिक वाढू शकतात. ‘वेस्टलाइफ फूडवर्ल्ड’ ही कंपनी दक्षिण भारतात बर्गर ब्रँड ‘मॅकडोनाल्ड’ ची फ्रँचायझी चालवते. (Westlife Foodworld Limited)
2 वर्षांपूर्वी