WhatsApp Down | तब्बल दोन तासांनंतर व्हाटसअँप सेवा पुन्हा सुरू, यापूर्वी असं किती वेळा घडलं आहे पहा
WhatsApp Down | तब्बल दोन तास ठप्प राहिल्यानंतर व्हाटसअँपची सेवा पुन्हा सुरू झाली आहे. चला जाणून घेऊया भारतात दुपारी 12.30 वाजल्यापासून युजर्सना व्हाटसअँपवर मेसेज पाठवणे आणि पाहण्यात अडचणी येत होत्या. खरंतर हा डाऊन व्हाटसअँपच्या चॅट आणि ग्रुप चॅटमध्ये पाहायला मिळत होता. व्हाटसअँपवर स्टेटस पाहण्यातही युजर्सना अडचणी येत होत्या. सर्वप्रथम व्हाटसअँप ग्रुप चॅटमध्ये मेसेजिंगमध्ये अडचण आली आणि त्यानंतर सामान्य चॅटवरूनही युजर्सना मेसेज पाठवता आले नाहीत. मेटानेही याला दुजोरा दिला होता.
2 वर्षांपूर्वी