Wipro Shares Buyback | विप्रो बायबॅक योजना पूर्ण झाली, गुंतवणूकदारांना शेअर विक्रीवर किती परतावा मिळाला?
Wipro Shares Buyback | भारतातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने 12 हजार कोटी रुपयेची बायबँक योजना पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. या योजने अंतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांचे स्वीकृती प्रमाण 77.40 टक्के नोंदवले गेले आहे. याचा अर्थ विप्रो कपनीने किरकोळ शेअर्स गुंतवणूकदारांकडून ऑफर केलेल्या 77.40 टक्के शेअर्सची परत खरेदी केली आहे. हे प्रमाण कंपनीच्या मागील बाय बकच्या ट्रॅक रेकॉर्ड एवढेच आहे. मागील एकूण चार बायबॅकमध्ये किरकोळ गुंतवणुकदारांचे ऑफर प्रमाण 50 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान राहिले आहेत. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी विप्रो कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 393.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी