सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश रमन्ना यांच्यावर मुख्यमंत्री रेड्डींचे गंभीर आरोप
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश एन वी रमन्ना यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन यांनी सरन्यायाधीशांना या संदर्भात आठ पानांचे पत्र पाठवले आहे. जगनमोहन रेड्डी यांनी आरोप केला आहे की, न्यायाधीश रमना टीडीपी अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे निकटवर्तीय आहेत व त्यांच्याच इशाऱ्यावरून वायएसआर काँग्रेसचे सरकार पाडू इच्छित आहेत.
4 वर्षांपूर्वी