मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकते, विधानसभेसाठी नाही - बी एस येडियुरप्पा
केवळ मोदी लाट पक्षाला राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकत नाही. मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकते, परंतु राज्यात निवडणूक जिंकायची असेल तर पक्षाला विकास कामे करावीच लागतील, असं मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी व्यक्त केले. रविवारी बेंगळुरूमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भारतीय जनता पक्षाने आतापासूनच निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
3 वर्षांपूर्वी