महत्वाच्या बातम्या
-
लोकं डोळ्यादेखत मरताहेत, आम्ही हतबल ठरतोय; भाजप आमदाराचं मुख्यमंत्री योगींना पत्र
देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू हे गुन्हेगारी कृत्य असून ते नरसंहारापेक्षा कमी नाही - अलाहाबाद हायकोर्ट
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जबाबदारी असणाऱ्यांना अलाहाबाद हायकोर्टाने चांगलंच फटकारलं आहे. रुग्णालयात ऑक्सिजनअभावी करोना रुग्णांचा मृत्यू होणं गुन्हेगारी कृत्य असून नरसंहारापेक्षा कमी नाही अशा शब्दांत हायकोर्टाने सुनावलं आहे. न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि अजित कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होती. लखनऊ आणि मेरठमध्ये ऑक्सिजनअभावी होणाऱ्या करोना रुग्णांच्या मृत्यूसंबंधी समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या पोस्टची दखल घेताना खंडपीठाने हा निष्कर्ष नोंदवला.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात भाजपचं शिवभोजन थाळीवरून राजकारण | तर यूपीत रुग्णांच्या जेवणात किडे
महाराष्ट्रात शिवसभोजन थाळीवरून भारतीय जनता पक्षाचं राजकारण आणि टीका काही नवा विषय राहिलेला नाही. कोरोना आपत्तीत आणि निर्बंध लागलेले असताना दारिद्र्य रेषेखालील गरीब लोकांना याचा मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळलं. मात्र या शिवभोजन थाळीचं राजकारण महाराष्ट्रात भाजप नेत्यांच्या नेहमीच केंद्रस्थानी राहिलेलं आहे. मात्र आता भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात गरिबांना आणि कोरोना रुग्णांना किती नित्कृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं याचा पुरावा समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमच्याकडे ऑक्सिजन संपला आहे, तुमचे रुग्ण घेऊन जा | यूपीत अनेक इस्पितळांचा पत्रकांचा सपाटा
नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, तर दुसरीकडे ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याची घटना घडली.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश कोरोना आपत्ती | योगी सरकार संपूर्ण राज्यात वीकेंड लॉकडाऊन लावणार
लखनऊसह उत्तर प्रदेशातील 5 शहरांमध्ये लॉकडाऊन लादला जाणार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सोमवारी, हायकोर्टाने लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि गोरखपूरमध्ये 26 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले होते. याविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यूपी सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवले. सरकारने म्हटले आहे की, लॉकडाऊनचा आदेश देणे न्यायपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही.
4 वर्षांपूर्वी -
लसचा पहिला डोस घेतल्याच्या 9 दिवसानंतर योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर योगींनी स्वतःला विलगीकृत केले होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, 5 एप्रिल रोजी त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. सोशल मीडियावर त्यांनी कोरोना संक्रमणाची माहिती जारी केली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक - योगी आदित्यनाथ
भारताने व्हॅक्सीनेशनच्या बाबतीत शनिवारी मोठा विक्रम केला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 10 कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताला एवढ्या लसी देण्यासाठी केवळ 85 दिवस लागले. एवढ्या वेळेत अमेरिकेत 9.2 कोटी आणि चीनमध्ये 6.14 कोटी डोस देण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. मात्र एकूण व्हॅक्सीनेशनच्या हिशोबाने पाहिले तर अमेरिका आणि चीन भारतापेक्षा खूप पुढे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
योगी सरकारचा भोंगळ कारभार | कोरोना लस ऐवजी प्राणी चावल्यावर देण्यात येणारी रेबिजची लस दिली
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओशानंतर आता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक आहे.
4 वर्षांपूर्वी -
५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार आणि क्रूर हत्या | मंदिरातील पुजाऱ्यावरही गुन्हा
उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये एका ५० वर्षीय आंगनवाडी कर्मचारी असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर तिची क्रूर हत्या करण्यात आलीय. सामूहिक बलात्कारानंतर महिलेला मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, पीडित महिलेच्या शरीरात खासगी अंगांत लोखंडी रॉड घुसवल्याचंही समोर आलंय.
4 वर्षांपूर्वी -
यूपीत खळबळ | मथुरेतील आश्रमात २ हिंदू साधूंचे मृतदेह आढळले | विष प्रयोगाचा आरोप
योगी सरकारच्या राज्यात एक खळबळ माजविणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशात योगिता सरकार हिंदुत्वाच्या अनेक गप्पा मारताना देशाने पाहिलं आहे. भाजपाची सत्ता नसलेल्या इतर राज्यांना भाजपचे नेते हिंदुत्वावरून नेहमीच लक्ष करत असतात. तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावरून इतर राजकीय पक्षांना नेहमीच लक्ष करत असतात. मात्र स्वतःची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हिंदुत्वाशी संबंधित घटना घडल्यानंतर भाजपचे नेते शांत असतात हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. आता पुन्हा तशीच घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केरळस्थित पत्रकार 5 ऑक्टोबरपासून युपीच्या तुरूंगात | सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस
केरळमधील पत्रकार सिद्दिक कप्पन यांना उत्तर प्रदेशातील हाथरास येथे जात असताना योगी सरकारकडून अटक करण्यात आली होती. संबधित अटकेविरोधात सवोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. हाथरास येथे एक मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि धक्कादायक म्हणजे तिचा इस्पितळात मृत्यू झाल्यावर युपी पोलिसांनी स्वतःच अंत्यविधी उरकला होता.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | अर्नबने योगींना अशिक्षित-पागल म्हटलेले | पण योगींकडून अर्नबची स्तुती
युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमधील एका जाहीर सभेत, अर्णब गोस्वामी हे एक प्रसिद्ध आणि मोठे पत्रकार आहेत, असे म्हटले आहे. परंतु, यापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी एका LIVE टीव्ही शोदरम्यान आदित्यनाथ यांना अशिक्षित आणि पागल म्हटले होते. मात्र त्यानंतर विरोधकांनी त्यांची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. सपाचे प्रवक्ते पवन पांडे यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत, ‘क्या से क्या हो गया देखते-देखते,’ असे म्हटले आहे. पवन पांडे यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचा दुपट्टीपणा | यूपीत जुलै-ऑगस्टमध्ये २ पत्रकारांच्या क्रूर हत्या झाल्या होत्या | पण...
उत्तर प्रदेशमधील गुन्हेगार दिवसेंदिवस निर्भय होत चालले आहेत याची अनेक उदाहरण रोज समोर येतात. आज महाराष्ट्रात अर्णब गोस्वामीला त्याच्या व्यावसायिक कारणातील कुरापतीमुळे म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वास्तविक याचा पत्रकारितेवरील हल्ल्याशी कोणताही संबंध नाही. मात्र भाजपकडून पत्रकारितेवरील हल्ल्याची बोब सुरु असून त्याचा थेट आणीबाणीशी संबंध जोडला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
भय इथले संपत नाही | अल्पवयीन मुलांकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार व हत्याकांडाच्या घटनेची धग अद्याप शमलेली नसताना, या ठिकाणी पुन्हा एक अतिशय संतापजनक व धक्कादायक अशी गुन्हेगारी घटना घडल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Hathras Gangrape | पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्टाने व्यक्त केली नाराजी
हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सोमवारी सुनावणी पार पडली. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पीडितेच्या कुटूंबाने आपली बाजू मांडली. तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने अनेक अधिकारी न्यायालयात हजर होते. आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अशा प्रकारे मरणाऱ्या मुली शेतात, नाल्यात आणि झुडपातच सापडतात | भाजप नेता बरळला
हाथरस प्रकरणी पीडितेबाबत उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने लज्जास्पद वक्तव्य केले आहे. दलित युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर भाष्य करताना या भाजप नेत्याने आरोपी निर्दोष असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या मुली या उसाच्या, भाताच्या, बाजरीच्या शेतीत, नाल्यांमध्ये आणि जंगलात मृतावस्थेत सापडत असतात. असे का?, कारण त्यांच्या मरणाच्या जागाच त्या असतात, असे आक्षेपार्ह वक्तव्य या भाजप नेत्याने केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
हाथरस प्रकरण | योगी सरकारने सुप्रीम कोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात धक्कादायक कारण
हाथरस प्रकऱणावरुन वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टाने हे सर्व थांबलं पाहिजे अशा शब्दांत उत्तर प्रदेश सरकारला फटकारलं आहे. हाथरस घटना भयंकर असून आम्हाला न्यायालयात पुन्हा पुन्हा तोच युक्तिवाद नको आहे असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. हाथरसमधील साक्षीदारांना कशा पद्धतीने सुरक्षा पुरवली जात आहे यासंबंधी सुप्रीम कोर्टाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारला दिला आहे. याप्रकरणी सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हाथरस बलात्कारातील आरोप असलेल्या तुरुंगात कोणाच्या भेटीस पोहचले भाजपा खासदार?
‘हाथरस बलात्कारप्रकरणी योगी सरकारचे पाय रोज खोलातच जात आहेत. हाथरस येथे दलित मुलीवर सामूहिक बलात्कार व नंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना हाथरसचे भाजपाचा खासदार राजवीर सिंह दिलेर यांनी रविवारी अलिघर तुरुंगाला भेट दिली. याच तुरुंगामध्ये हाथरसमधील दलित मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य चार आरोपींना ठेवण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
हाथरस प्रकरण | आरोपींच्या समर्थनात भाजपकडूनच मेळावे | शिवसेनेचं टीकास्त्र
‘हाथरस बलात्कारप्रकरणी योगी सरकारचे पाय रोज खोलातच जात आहेत. हाथरसप्रकरणी जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या समर्थनार्थ हाथरसच्या आसपास मेळावे घेतले जातात व त्या मेळाव्यांचे नेतृत्व भाजपचे पुढारी करतात असे प्रसिद्ध झाले आहे. तसे काही खरोखरच घडले असेल तर ते कृत्य लाजिरवाणे आणि किळसवाणेच आहे.’ अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. तसंच, ‘पीडित मुलीलाच सरकारने जाळून राख केले व पुरावे मातीत मिसळले. हे सर्व हाथरसच्या पोलिसांनी ‘वर’ विचारल्याशिवाय केले काय? सगळे काही संगनमतानेच झाले आहे’ असा थेट आरोपही शिवसेनेनं योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert! नोटांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार | आरबीआयची माहिती
नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का ? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. आता रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. कोरोना संक्रमण नोटांनी देखील होऊ शकते. नोटांचा व्यवहार केल्याने कोरोना संक्रमण तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू शकते असे इंडस्ट्री बॉडी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटलंय. नोटांमुळे कोरोना पसरण्याच्या वृत्ताला आरबीआयने याला दुजोरा दिलाय.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC