महत्वाच्या बातम्या
-
उत्तर प्रदेशातील हाथरस गँगरेप | पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू
उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gang Rape Victim) येते 15 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या नराधमांनी तिची जीभ कापली, गंभीर अवस्थेत असलेल्या या तरुणीवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी पीडितेचे निधन झाले.
5 वर्षांपूर्वी -
युपी हादरलं | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील रेल्वे कॉलनीत मायलेकांची गोळ्या घालून हत्या
उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेलं हत्यांचं सत्र सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत दुहेरी हत्याकांडांच्या घटनेला २४ तास लोटत नाही, तोच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या रेल्वे कॉलनीत मायलेकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली आहे. मृत रेल्वे अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगा असून, या घटनेनं लखनौ हादरलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीची यूपीत निर्घृण हत्या | आरोपी डॉक्टर ताब्यात
एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीच्या हत्याकांडाने उत्तर प्रदेश हादरले आहे. आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये एमडी करणारी डॉक्टर योगिता गौतम हिची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
वचन राम राज्याचं होतं, पण दिलं गुंडाराज - राहुल गांधी
उत्तर प्रदेशात एका पत्रकारावर काही जणांनी गोळीबार केल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली. यात पत्रकाराचा मृत्यू झाला असून, या घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. “वचन राम राज्याचं होतं, पण दिलं गुंडाराज,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विकास दुबे आणि सरकारचे हितसंबंध उघड होण्याच्या भीतीने गाडी पलटवली - अखिलेश यादव
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.
5 वर्षांपूर्वी -
कानपूर हत्याकांडातील कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.
5 वर्षांपूर्वी -
८ पोलिसांच्या हत्याकांडातील मोस्ट वॉन्टेड आरोपी विकास दुबेला अटक
कानपूर शूटआऊट प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेला अटक करण्यात आली आहे. त्याआधी विकासच्या तीन साथीदारांचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. गेल्या काही दिवसांपासून विकास दुबेचा शोध सुरू होता. विकास दुबेला उज्जैनमधल्या फ्रीगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिथून त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली - प्रियंका गाधी
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह 8 पोलीस शहीद झाले. विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले. ही बातमी समजताच एसएसपी आणि आयजी घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक टीमनेही येथे तपासकार्य सुरू केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशात पोलीस पथकावर गुंडांकडून अंदाधुंद गोळीबार, ८ पोलिसांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह 8 पोलीस शहीद झाले. विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले. ही बातमी समजताच एसएसपी आणि आयजी घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक टीमनेही येथे तपासकार्य सुरू केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
युपी: लहान मुलांच्या मिड-डे जेवणात मृत उंदीर; ९ मुलांची प्रकृती खालावली
मिड-डे मील घोटाळा प्रकरणात भारतीय जनता पक्ष शासित उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. अनेक वेळा मिड-डे जेवणामध्ये मुलांना केवळ मीठ आणि ब्रेड दिले जातात. तर अनेकदा एक लिटर दुधात बादलीभर पाणी मिसळून तब्बल ८१ मुलांना पिण्यास दिले जाते. मात्र आता जेवणाची गुणवत्ता विकोपाला गेल्याचं चित्र आहे, कारण मिड-डे जेवणात मृत उंदीर सापडल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या नेत्याने कमलेश तिवारी यांची हत्या केली; कमलेश यांच्या आईचा आरोप
हिंदु समाज पक्षाचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आता एक नवीन ट्विस्ट समोर आले आहे. कमलेश तिवारी यांच्या कुटुंबीयांनी भाजप नेत्यावर कट रचण्याचा आरोप केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. राम जानकी मंदिर प्रकरणामुळे आपल्या मुलाला लक्ष्य करण्यात आले आहे असा खळबळजनक आरोप कमलेश तिवारीच्या आईने केला आहे. स्थानिक नेते शिवकुमार गुप्ता यांचे नाव घेत त्या म्हणाल्या की, ते माफिया असल्याने माझ्या मुलाच त्यांच्यासमोर काहीच चालू शकलं नाही. तत्पूर्वी, कमलेश तिवारी यांच्या मुलानेही एनआयएला घटनेची चौकशी करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की आम्हाला प्रशासनावर विश्वास अजिबात नाही.
6 वर्षांपूर्वी -
देशातील आर्थिक मंदी मुघल व इंग्रजांमुळे; मोदींनी परिवर्तन केलं: योगी आदित्यनाथ
देशात सध्या सर्वच बाजूंनी बेरोजगारी वाढत असताना सरकारसमोरील अडचणी देखील वाढताना दिसत आहेत. नोटबंदी आणि केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून देशात बेरोजगारी ऐतिहासिक आकडे गाठताना दिसत आहे. ऑटो, बांधकाम, टेक्सटाईल अशा मोठा रोजगार देणाऱ्या उद्योगांना घरघर लागलेली असताना आता त्यात शेअर बाजारातील शेअर खरेदी विक्री संबंधित कंपन्यांना सुद्धा मोठा फटका बसताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
युपी'मध्ये पावसामुळे १५ जणांचा मृत्यू तर १३३ इमारती कोसळल्या
युपी’मध्ये पावसाचा हाहाकार मजल्याचे दिसत आहे. कारण सलग तीन दिवस धोधो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील तब्बल १४ जिल्ह्यांना या जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. जोरदार वादळी वारा आणि वीज कोसळल्यामुळे आतापर्यंत एकूण १५ जणांचा दर्दैवि मृत्यू झाला आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्यते उपचार सुरू आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जंगलराज! यूपीत पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ बनवून व्हायरल
यूपीत कायदा-सुव्यवस्थेची अक्षरशः धिंडवडे उडाल्याचे चित्र असून राज्यात योगी राज आहे की जंगलराज असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल योगी सरकारकडून अनेक दावे केले जातात पण राज्यात महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं चित्र अनेक घटनांवरून सिद्ध होत आहे. आता रामपूरमध्ये एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उन्मत्त भाजप खासदाराने पोलिसाच्या कानाखाली मारत, ठार मारण्याची धमकी दिली
लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार बहुमताने सत्तेत पुन्हा विराजमान झाले आणि याच लोकसभा निवडणुकीत अनेकांची लॉटरी लागल्याने त्यातील काही खासदार डोक्यात सत्तेची हवा गेल्यासारखे वागत आहेत. तसाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडलेला आहे. उत्तर प्रदेशातील धौरहरा मतदारसंघाच्या भाजप खासदार रेखा वर्मा यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला श्रीमुखात मारून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संबंधित पोलीस शिपायाचे नाव श्याम सिंग असून त्याने लखीमपूर खिरी येथील मोहम्मदी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: 'बलात्काराचे वेगळे नेचर असते', भाजपा मंत्र्याचं संतापजनक विधान
यूपीत सतत महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यात भर म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारमधील एका मंत्र्याने धक्कादायक विधान केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. उपेंद्र तिवारी असे या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याचे नाव असून त्यांनी बलात्कार वेगवेगळ्या नेचरचा असतो, असे संतापजनक विधान केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
टि्वटरने योगी आदित्यनाथ यांचे 'ते' वादग्रस्त टि्वट हटवले
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ता संघर्षासाठी एकमेंकावर टीका करने चालू आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम लीगवर वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. यावर टि्वटरने कारवाई करत योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त टि्वट वेबसाईटवरून कायमस्वरूपी हटवले आहे. यासोबतच इतर नेत्यांचेही ३४ टि्वट हटवले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराला ‘मोदींची सेना’ म्हणणारेच देशद्रोही: माजी लष्करप्रमुख व भाजप नेते व्ही.के.सिंग
भारतीय लष्कर ही ‘मोदी यांची सेना’ आहे, असे धक्कादायक वक्तव्य करणारे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माजी लष्करप्रमुख आणि सध्या केंद्रीय मंत्री असलेले जनरल व्ही.के.सिंग यांनी चांगलीच चपराक दिली आहे. भारतीय लष्कराला मोदींची सेना म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून, अशाप्रकारे भारतीय सैन्याचा अपमान करणारेच देशद्रोही असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही; माजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास संतापले
माजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास यांनी युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना चांगलेच झाडाले आहे. देशाचं सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही आणि त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे रामदास यांनी ध्यानात आणून दिले आहे. आदित्यनाथ यांनी एका सभेदरम्यान सैन्याचा उल्लेख “मोदीजी की सेना” असा उल्लेख करत सैन्याच्या राजकीय वापर करणाचा प्रयत्न केला होता. त्यावर संतापलेल्या माजी नौदल प्रमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
केजरीवाल सरकारचा अर्थसंकल्प 'आधुनिक शाळांचा' तर योगी सरकारचा 'गोशाळांचा'
आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा तिसरा अर्थसंकल्प युपीच्या विधानसभेत सादर झाला. दरम्यान, लवकरच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने योगी सरकारची मोठी कसोटी लागणार होती आणि त्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. युपीचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL