YouTube Handle | तुमच्या यु-ट्युब अकाउंटला युनिक आयडेंडीटी मिळणार, सर्च करण अगदी सोपं होणार
YouTube Handles | येणाऱ्या आठवड्यापासून, YouTube कम्युनिटी मेंबर्स साठी एकमेकांना शोधणे आणि कनेक्ट करणे सोपे होणार आहे. कारण यासाठी कंपनी युट्यूब हँडल सादर करणार आहे व प्रत्येक चॅनलसाठी एक युनिक हँडल असणार असल्याचे कंपनीने यावेळी म्हटले आहे. याद्वारे, चाहत्यांना त्यांच्या आवडत्या निर्मात्यांची क्रिएटर्स सहजपणे शोधता येईल आणि त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. दरम्यान, हँडल चॅनेलच्या पेजवर आणि शॉर्ट वर दिसेल. YouTube हळूहळू सर्व चॅनेलसाठी हँडल रिलीझ करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कंपनीने असे म्हटले आहे की पुढील महिन्यामध्ये सर्व निर्मात्यांना त्यांच्या चॅनेलसाठी हँडल निवडण्याची माहिती देणार आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये निर्माते डीफॉल्ट हँडल बनणार आहेत. याव्यतिरिक्त, YouTube स्टुडिओमध्ये सूचना येताच तुम्ही तुमच्या चॅनेलचे हँडल बदलणे निवडू शकणार आहात.
2 वर्षांपूर्वी