6 January 2025 5:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

5G Data Mobile | 5G नेटवर्कने तुमचा डेटा लवकर संपत आहे का?, काळजी नको, मोबाईलमध्ये करा 'हे' सेटींग आणि रिलॅक्स राहा

5G Data Mobile Updat

5G Data Mobile Update | गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये 5G सर्व्हिसेसची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच ग्राहक जेव्हा पासून 5G सेवा वापरत आहेत तेव्हा पासून ग्राहकांचा चांगला प्रतिसाह येत आहे. यासोबत खूप ग्राहकांनी दावा देखील केला आहे की डेटा खूप वेगवान होत आहे. 4G पेक्षा जास्त वेगाने डेटा 5G साठी खर्च होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे, आणि त्यामागचे कारण म्हणजे नेटवर्कचा वेग. याचा अर्थ, वापरकर्ते पूर्वीपेक्षा जास्त डेटा वापरत आहेत, कारण त्यांचा इंटरनेटचा वेग पूर्वीपेक्षा जास्त चांगला झाला आहे. यामुळे, 5G मल्टी-टास्किंग काम करतो आहे आणि काम देखील पटकन पूर्ण होते. त्यामुळे त्यांचा डेटा लवकर संपतो आहे.

5G वर डेटा खर्च करण्याचे कारण
बऱ्याच वापरकर्तांचा हा प्रश्न आहे की, 5G इंटरनेटला जास्त डेटा का लागत आहे? तर याचे उत्तर असे आहे की, तुम्हाला 5G वर चांगले इंटरनेट कनेक्शन मिळते आहे आणि ज्यामुळे तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर करत आहात. 2020 मध्ये, ओपन सिग्नलने एक अहवाल जारी केला आहे ज्याने पुष्टी केली की 5G च्या येण्याने वापरकर्त्यांचा डेटा 2.7 पटीने वाढला आहे, म्हणजेच 5G नेटवर्कवर अधिक डेटा खर्च केला जाणार आहे. याशिवाय बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अॅप्समुळे तुमचा डेटाही लवकर संपत आहे. तसेच जर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा डेटा लवकर संपू नये असे वाटत असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये काही सेटिंग करावे लागतील, आणि त्यानंतर तुम्ही तुमचा डेटा वाचवू शकता.

काही फोन सेटिंग्ज बंद करा
जर तुम्ही 5G नेटवर्क वापरत असाल आणि तुमचे नेट लवकर संपत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये काही सेटींग करायला हवी आहे. तर असे काही सेटिंग्ज तुमच्या फोनमध्ये सुरु ठेवल्यामुळे ज्याचा तुम्ही वापरही करत नाही आणि तुमचा डेटाही त्यामुळे नष्ट होतो आहे तर अशा परिस्थितीत, तुम्ही वापरत नसलेल्या सर्व सेटिंग्ज बंद करणे तुमच्यासाठी उपयोगाचे आहे. असे केल्याने तुम्ही अनावश्यक डेटा गमावण्यापासून वाचू शकता.

ऑनलाइन व्हिडिओ पाहणे कमी करा
डेटा संपण्यामध्ये सर्वांत जास्त वाटा हा व्हिडीओ पाहण्याचा आहे. तुम्ही दिवस दिवस सोशल मीडयावर व्हिडीओ पाहत बसता त्यामुळे तुमच्या मोबाईलचा डाटा संपतो आहे. याशिवाय, जर तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड कमी असेल तर व्हिडिओ कमी गुणवत्तेत प्ले होतो आणि दुसरीकडे, जर तुम्ही 5G इंटरनेट सेवा वापरत असाल, तर तुमच्या इंटरनेटच्या उच्च गतीमुळे, व्हिडिओ उच्च गुणवत्तेत प्ले होतो आणि त्यामुळे तुमचा डेटा झपाट्याने संपतो आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 5G Data Mobile Update Checks details 16 October 2022.

हॅशटॅग्स

5G Data Mobile Updat(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x