24 November 2024 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

5G Mobile | 4G स्मार्टफोन उत्पादन थांबले, 5G स्मार्टफोनची किंमत 10 हजारांच्या वर असेल, महत्वाची अपडेट्स

5G Mobile

5G Mobile Updates | लवकरच भारतामध्ये सर्वत्र 5G नेटवर्क सुरु होईल या मध्ये कोणताही वाद नाही. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलचे 5G रोलआउट देशातील अनेक भागांमध्ये सुरू देखील झाले आहे आणि कंपन्यांनी डिसेंबर 2023 च्या सुरुवातीस देशभरात 5G सुरू करण्याचे आश्वासन आपल्या कस्टमर्सला दिले आहे. तसेच सर्व स्मार्टफोन कंपन्यांनी सुसंगत हँडसेटवर 5G सपोर्ट अनलॉक करणारे सॉफ्टवेअर अपडेट्स आणण्यास सुरुवात केली आहे आणि यापैकी बहुतेक स्मार्टफोनची किंमत सुमारे 15,000 रुपये किंवा त्याहून अधिक असणार आहे. त्यामुळे 2023 मध्ये 5G अधिक मुख्य प्रवाहात येण्याची शक्यता असल्याने, स्मार्टफोन कंपन्या आता भारतामध्ये आणखी बजेटसह 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

4G फोनचे उत्पादन हळूहळू थांबेल
मोबाईल फोन निर्मात्यांच्या प्रतिनिधींनी उच्च सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आणि त्यांना आश्वासन दिले आहे की ते 5G नेटवर्क सपोर्टसह 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे फोन लॉन्च करणार आहेत. तसेच प्रतिनिधींनी पुढे उघड केले आहे की फोन कंपन्या या किंमतीच्या टप्प्यावर 4G फोनचे उत्पादन हळूहळू थांबवणार आहेत.

5G चे बजेट 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल
स्मार्टफोन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी याची खात्री केली की ते 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या 4G फोनचे उत्पादन बंद करणार आहेत. तसेच 5G तंत्रज्ञानाचे उत्पादनाला सुरुवात करतील. दूरसंचार विभाग (DoT) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) च्या काही उच्च अधिकाऱ्यांसोबत यावेळी बैठक झाली आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी मोबाइल ऑपरेटर आणि स्मार्टफोन निर्मात्यांना त्यांच्या 5G सेवा फोनसह पुढील तीन महिन्यांत एकत्रित करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत.

सरकारी अधिकाऱ्यांनी मोबाईल फोन उत्पादकांना भारतामध्ये 5G सेवा लवकर स्वीकारण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर अपग्रेडला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले असल्याचे समोर आले आहे. तसेच 100 दशलक्ष 5G-तयार फोनपैकी, नेटवर्कशी सुसंगत नाहीत कारण Apple आणि Samsung सारख्या स्मार्टफोन कंपन्यांनी 5G उघडण्यासाठी अपडेट पुढे ढकलले नाही. कंपन्यांनी आश्वासन दिले की ते टेलकोससोबत काम करत आहेत आमि याची खात्री करण्यासाठी ग्राहकांना 5G अ‍ॅक्सेस मिळेल आणि याबाबतची अपडेट लवकरच समोर येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 5G Mobile smartphone updates checks details 16 October 2022.

हॅशटॅग्स

5G Mobile Updates(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x