26 April 2025 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 27 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, 46 रुपयांच्या शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB
x

Amazon Virtual Try On Shoes | आता तुम्हाला घरी बसून ऑनलाइन शूज घालून पाहता येणार | चला बघा घालून पटापट

Amazon Virtual Try on Shoes

Amazon Virtual Try On | ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अ‍ॅमेझॉनने ग्राहकांसाठी एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे. या माध्यमातून आता तुम्ही घरी बसून शूज ट्राय करू शकणार आहात. व्हर्च्युअल ट्राय ऑन असं या फीचरचं नाव आहे. त्याचा वापर करण्यासाठी अ‍ॅमेझॉन अ‍ॅप उघडून अ‍ॅमेझॉन स्टोअरमधून शूजवर जावं लागतं. त्याच्या खाली व्हर्च्युअल ट्राय-ऑन बटण दिसेल.

बटणावर क्लिक केल्यास फोनचा कॅमेरा उघडेल :
बटणावर क्लिक केल्यास फोनचा कॅमेरा उघडेल आणि तुम्हाला तुमचा पाय दाखवावा लागेल. फोनच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की, पायात तेच बूट दिसतील. अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे की न्यू बॅलन्स, अ ॅडिडास आणि रीबॉकसह सर्व शीर्ष ब्रँडच्या डिजिटल फिटिंग्जसाठी हजारो शूज उपलब्ध आहेत. मात्र, सध्या नाइकेचा समावेश नाही.

युजर्सना शूजच्या लूकची कल्पना येईल :
डिजिटल शूज ट्राय केल्याने तुम्हाला कम्फर्ट किंवा फिट कळणार नाही, तरी युजर्सना शूजच्या लूकची कल्पना नक्कीच येईल. चला जाणून घेऊया की असेच काही वैशिष्ट्य लेन्सकार्ट या लोकप्रिय वेबसाइटवरही चष्म्यासाठी उपलब्ध आहे. इथे तुम्ही चेहरा स्कॅन केल्यानंतर कोणताही चष्मा ट्राय करू शकता, ज्यामुळे तो तुमच्या चेहऱ्यावर कसा दिसेल याची कल्पना येईल.

या युजर्ससाठी अ‍ॅमेझॉनचे फीचर :
अमेरिका आणि कॅनडामध्ये आयफोन युजर्ससाठी अ‍ॅमेझॉनचे ‘व्हर्च्युअल ट्राय ऑन’ फीचर सादर करण्यात आले आहे. हे वैशिष्ट्य केवळ आयओएसवर उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉन आणि अॅपल २०१७ पासून शॉपिंगचा अनुभव वाढवण्यासाठी व्हर्च्युअल रिअॅलिटीचा वापर करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Amazon Virtual Try on Shoes feature check details 11 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amazon Virtual Try on(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या