Google वर 'या' गोष्टी चुकूनही सर्च करू नका | मोठ्या नुकसानाची शक्यता - नक्की वाचा
मुंबई, १२ जुलै | गुगल हे जगातील माहितीचं सर्वात मोठं ऑनलाईन जग आहे. येथे करोडो गोष्टी एक क्लिकवर जगभरातून शोधल्या जातात. त्यात आज प्रत्येक हातात मोबाईल आल्याने त्याचं प्रमाण न मोजण्यापलीकडे गेलं आहे. या माहिती जाळ्यात जशा चांगल्या तशा नुकसान करणाऱ्या देखील लाखो गोष्टी आहेत.
त्यात आजकाल प्रत्येकजण कोणत्याही गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी गूगल सर्च इंजिनचा वापर करतो. गुगलवर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे अचूक परिणाम मिळतात. परंतु, बर्याचहा आपण गुगलवर अशा गोष्टी शोधतो, ज्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. आज या लेखातून आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात. गुगलवर खालील गोष्टी शोधल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. तथापि, तुमची ही चूक तुम्हाला तुरुंगाची हवा खायला भाग पाडू शकते. तसेच काही गोष्टीचा आपल्या जीवनावर विपरित परिणाण होऊ शकतो. त्यामुळे गुगलवर चुकूनही अशा आक्षेपार्ह गोष्टींची माहिती सर्च करू नका. खालील मुद्द्यांच्या आधारे गुगलवर कोणत्या गोष्टींविषयी सर्च करू नये, यासंदर्भात जाणून घेऊयात
गोळ्या-औषध गुगलवर सर्च करू नका:
जर तुम्हाला आरोग्याची समस्या जाणवत असेल तर आपल्या लक्षणांवर आधारित Google वर औषध-गोळ्यांचा शोध घेण टाळा. चुकीची औषधे घेतल्यास तुमचे आरोग्य आणखी बिघडू शकते. म्हणून जेव्हा जेव्हा आपली तब्येत खराब असेल तेव्हा ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
बँक ऑनलाईन वेबसाईट:
बँकेची ऑनलाईन बँकिंग वेबसाईट गुगलवर सर्च करू नका. ऑफिशियल वेबसाईटऐवजी, बँकेचा लॉगइन पासवर्ड एखाद्या फेक वेबसाईटवर चुकून टाकला जाऊ शकतो. ज्यामुळे हॅकर्स तुमच्या डिटेल्सचा चुकीचा फायदा घेऊ शकतात.
बॉम्ब कसा बनवायचा याचा शोध घेऊ नका:
बॉम्ब बनवण्यासंदर्भात कोणतीही गोष्ट गुगलवर सर्च करू नका. बॉम्ब बनविण्याची पद्धत किंवा त्याशी संबंधित कोणतीही गोष्ट शोधल्यामुळे आपणास तुरूंगात देखील जाव लागू शकतं. Google वर आपण या प्रकारच्या कटेंटचा शोध घेत असाल, तर आपला आयपी अॅड्रेस सुरक्षा यंत्रणांपर्यंत पोहोचवला जावू शकतो. त्यानंतर सुरक्षा एजन्सी आपल्याविरूद्ध कारवाई करू शकतात.
apps आणि सॉफ्टवेअर डाउनलोड:
मोबाईल apps डाउनलोड करताना नेहमी ऑफिशियल app store किंवा google play store चा वापर करा. गुगलवर apps आणि सॉफ्टवेअर सर्च करताना मालवेअरचा धोका निर्माण होतो.
पर्सनल फायनान्स आणि स्टॉक मार्केट सल्ला:
गुगलवर कधीही पर्सनल फायनान्स आणि स्टॉक मार्केटबाबतचा सल्ला घेऊ नका. यासाठी गुगल सर्चवर कोणताही ऑथेंटिक सोर्स मिळत नाही. तसंच कोणताही व्यवहार गुगलवर मिळालेल्या माहितीच्या आधारे केल्यास फसवणूक होण्याचा धोका वाढतो.
सरकारी वेबसाईट:
फ्रॉड करणारे बँकिंग, म्युनिसिपॅलिटी किंवा रुग्णालय अशा सरकारी वेबसाईटला निशाणा करतात. अशावेळी ओरिजनल वेबसाईट ओळखणंही अनेकदा कठिण होतं. त्यामुळे कोणतीही माहिती सर्च करताना सावधगिरी बाळगा.
ई-कॉमर्स वेबसाईट ऑफर्स:
गुगलवर e-commerce वेबसाईटच्या ऑफर्सबाबत अनेक फेक पेज असतात, त्यापासून सावध राहा. फ्रॉड करणारे अनेकदा मॅलिशियस, खोट्या वेबसाईटवरून युजर्सचे बँकिंग डिटेल्स चोरी करतात.
Google वरून थेट मोबाइल अॅप्स डाउनलोड करू नका:
थेट गुगलवरून कोणतही अॅप डाऊनलोड करू नका. जेव्हा गुगल प्ले स्टोअरवर अॅप असेल, तेव्हाचं हे अॅप तुम्ही डाऊनलोड करा. कारण, बऱ्याचदा गुगलवर फेक अॅप्स असतात. जे आपला डेटा चोरी करू शकतात. गुगल प्ले स्टोअर कोणत्याही अॅपची आधी योग्य तपासणी करूनचं ते यूजर्संना डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देत असते. त्यामुळे प्ले स्टोअरवरूनचं अॅप डाऊनलोड करा.
Google वर खाजगी ईमेल शोधू नका:
नेहमी लक्षात ठेवा, Google वर आपले वैयक्तिक ईमेल लॉगिन शोधणे टाळा. असं केल्यास तुमचे अकाऊंट हॅक होण्याची तसेच पासवर्ड लिक होण्याची शक्यता असते. यामुळे तुम्ही आपल्या ईमेल आयडीद्वारे करण्यात आलेल्या घोटाळ्यात देखील अडकू शकता.
ग्राहक सेवा क्रमांक:
आपल्याला कोणतेही प्रोडक्ट वापरताना अडचण आल्यास आपण गुगलवरून ग्राहक सेवा क्रमांक सर्च करतो आणि यावर फोन लावतो. परंतु, या नंबरवर कॉल करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे गुगलवर ग्राहक सेवा क्रमांक शोधणं टाळा.
फ्री अँटी व्हायरस:
गुगलवर अँटी व्हायरस apps आणि सॉफ्टवेअर सर्च करू नका. यात ओरिजनल apps ची ओळख होणं कठिण होतं. त्यानुळे चुकून खोट्या फ्री अँटी व्हायरसवर क्लिक केल्यास डिव्हाईसमध्ये व्हायरस येण्याचा धोका वाढतो.
कूपन कोड:
शॉपिंगवेळी कूपन कोड मिळाल्यास ठीक आहे. परंतु गुगलवर कूपन कोड सर्च करू नका. कारण फेक वेबसाईट स्वस्तात कूपन विकून फसवणूक करू शकतात. यामुळे युजर्सचे बँकिंग डिटेल्स चोरी होण्याचा धोका वाढतो.
सायबर क्राइमला प्रोत्साहन देणारे हॅकर्स गुगल सर्चमधील कोणत्याही कंपनीचा बनावट हेल्पलाईन नंबर फ्लोट करतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण त्या नंबरवर कॉल करता तेव्हा आपला नंबर हॅकर्सपर्यंत पोहोचतो. त्यानंतर सिम स्वॅप सारख्या घटनांसह सायबर क्राइम करण्यासाठी हॅकर्स आपल्या नंबरवर कॉल करू शकतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Avoid searching these information on Google search engine news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट