19 April 2025 10:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

वाहनाच्या इंजिनमध्ये बदल करणे कायद्याने गुन्हा | तरी महाग पेट्रोलमुळे देशी जुगाड

Bikers, Battery, Petrol price hiked

मुंबई, ०३ मार्च: शंभर रुपयांकडे झेपावलेल्या पेट्रोल , डिझेलच्या किंमतींचा परिणाम आता बाजारावर जाणवू लागला आहे. ज्यांची वाहने नाहीत त्यांनाही आता भूर्दंड सोसावा लागणार आहे. आता मुंबईतील रिक्षा, टॅक्सीने प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली आहे. यामुळे वाढत्या इंधनाचा फटका आता सामान्य लोकांनाही बसणार आहे.

मुंबईत एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. फेब्रुवारीत इंधनाचे दर 14 वेळेस वाढवण्यात आले. या 14 दिवसांत दिल्लीत पेट्रोल 4.03 रुपयांनी तर डीझेल 4.24 रुपयांनी महागले आहे. तत्पूर्वी जानेवारी महिन्यात 10 वेळा इंधन महाग झाले होते. गेल्या महिन्यात दिल्लीत पेट्रोलच्या किमती प्रति लिटर 2.59 रुपयांनी तर डीझेलच्या किमती 2.61 रुपयांनी वाढवण्यात आल्या. अर्थातच या वर्षाच्या सुरुवातीला 2 महिने सुद्धा पूर्ण झाले नाहीत आणि पेट्रोल 6.77 रुपये प्रति लिटर आणि डीझेल 7.10 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे.

मात्र त्यानंतर वाहन धारकांनी धोके पत्करत देशी जुगाड सुरु केले आहेत. हे जुगाड देशात गगनाला भिडलेल्या पेट्रोलच्या किमतीनंतर समोर आले आहे. इंधनाचा हा खर्च टाळण्याचा प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे. तसेच अनेक लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. अशात जुनी पेट्रोल बाईकच इलेक्ट्रिक बाईक बनवण्याचा लोकांनी धडाका लावला असल्याचे पाहायला मिळत आहे.

जुनी पेट्रोल बाईक इलेक्ट्रिक बाईक कशी बनवायची आणि यासाठी किती खर्च येणार हा प्रश्न अनेकांना पडला असेल. परंतु एक गोष्ट तुम्हाला माहिती असायला हवी की, गाडीमधील इंजिनमध्ये बदल करणे हा गुन्हा आहे. तुम्हाला यासाठी दंड भरावा लागू शकतो.

समाज माध्यमांवर अशाप्रकारे बाईकचे पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रूपांतरित केल्याचा दावा केला जात आहे. यासाठी त्यांना १० हाजार रुपयांचा खर्च येत असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय बॅटरीच्या किमतीनुसार खर्चांमध्ये बदल होतो. तर गाडीच्या वेगाबाबत मेकॅनिकांकडून ६५ ते ७० किलोमीटर वेगाने धावू शकते असा दावा केला जात आहे.

बाईकमध्ये पेट्रोल इंजिनच्या ठिकाणी बॅटरी बसवली जाते. तसेच गीअर बॉक्स काढून बाईक थेट ऍक्सिलरेटरद्वारे नियंत्रित केली जाते. बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर बाईक तब्बल ३०० किमी पर्यंत रेंज देते. परंतु अशा पद्धतीने इंजिनध्ये बदल करणे हा कायद्याने गुन्हा आहे. नियमाने कंपनीने बनवलेल्या वाहनात बदल करणे हा गुन्हा आहे. यामुळे वाहनाचा विमा देखील संपुष्टात येऊ शकतो.

 

News English Summary: On social media, it is being claimed that the petrol engine of the bike has been converted into an electric engine in this way. It is said that they have to spend Rs. 10,000 for this. In addition, the cost varies according to the price of the battery. As for the speed of the vehicle, it is claimed by the mechanics that it can run at a speed of 65 to 70 kmph.

News English Title: Bikers using battery instead of petrol because of fuel price hiked news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या