18 April 2025 9:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

मिशन चांद्रयान २: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; वैज्ञानिकांची 'उत्तुंग' भरारी

chandrayaan 2, ISRO, PSLV, sriharikota, Mission chandrayaan 2, Mission chandrayaan 1

श्रीहरीकोटा : भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार होते.

‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले की, तत्पूर्वी १५ जुलै रोजी ठरलेले प्रक्षेपण ज्या तांत्रिक अडचणीमुळे ऐन वेळी पुढे ढकलावे लागले होते, ती अडचण दूर करण्यात आली असून, रॉकेट प्रक्षेपणासाठी पूर्णपणे तयार होती. सिवान म्हणाले की, शनिवारी सायंकाळी प्रक्षेपक रॉकेटची आणि इतर अनुषंगिक यंत्रणांची पुन्हा एकदा पूर्णांशाने रंगीत तालीम घेण्यात आली. त्यात कोणतीही अडचण किंवा दोष न आढळल्याने प्रक्षेपणासाठी उलटी गणती सुरू झाली आहे. आधी ३ वेळा पुढे ढकललेले प्रक्षेपण १५ जुलै रोजी पहाटे व्हायचे होते. त्यासाठी श्रीहरिकोट्याच्या अंतराळ तळापाशी उभारलेल्या दर्शक दीर्घेमध्ये जगभरातील पत्रकारांसह अनेक मान्यवरही जमले होते, परंतु उड्डाणाला अवघी ५६ मिनिटे शिल्कक असताना प्रक्षेपक रॉकेटमध्ये काही बिघाडाचा संशय आल्याने सावधगिरी म्हणून प्रक्षेपण थांबविण्यात आले होते.

१३० कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्याचांद्रयान-२ आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. मागील रविवारी मध्यरात्री नियोजित असलेले चांद्रयान-२ चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आल्याने इस्रोच्या शास्रज्ञांसह देशवासीयांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु आज हे यान नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्राच्या दिशेने यशस्वीरीत्या झेपावले आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून ‘बाहुबली’ रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-२ यानाने दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक आले होते. जवळपास ७५०० लोकांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. यासाठी इस्त्रोने १०,००० लोक बसू शकतील अशी गॅलरी बनविली होती. दरम्यान, आजच्या यशस्वी उड्डाणानंतर चांद्रयान-२ काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणास असून, त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. तसेच ६ सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्रावर उतरेल.

चांद्रयान २ ला पृथ्वीच्या कक्षेत पोहोचविण्यासाठी इस्त्रोने शक्तीशाली रॉकेट जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल मार्क 3 (जीएसएलव्ही-एमके ३) वापर केला. या रॉकेटला स्थानिक प्रसारमाध्यमांनी ‘बाहुबली’ असे नवा दिले आहे. या रॉकेटचे वजन ६४० टन असून रॉकेटची किंमत ३७५ कोटी रुपये आहे. या रॉकेटने ३.८ टन वजनाच्या चांद्रयान-२ या यानाला घेऊन उड्डाण केले. या यानाच्या निर्मितीचा खर्च ६.३ कोटी रुपये आहे. हे यान वेगवेगळे प्रवासाचे टप्पे पार करत ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरणार आहे. आतपर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या ३ देशांनीच यान चंद्रावर नेले आहे.

२००८ मध्ये भारताने चांद्रयान-१ ही मोहीम आखली होती. हे यान निरीक्षण करणारे होते. या यानाने दहा महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. चंद्रावर पाणी असल्याचा शोध याच मोहिमेमध्ये लागला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)#PSLV(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या