22 January 2025 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Drone Pilot Naukri | तुम्ही १२वी पास आहात? | अगदी सोपे प्रशिक्षण घेऊन ड्रोन पायलट बना | 30 हजार पगार घ्या

Drone Pilot Naukri

Drone Pilot Naukri | केंद्र सरकारच्या ड्रोन धोरणामुळे लाखोंच्या संख्येने रोजगार निर्माण होत आहेत. पण देशात ड्रोन पायलटची प्रचंड कमतरता आहे. अवघ्या काही वर्षांत १ लाख ड्रोन पायलटची गरज भासेल, असा सरकारचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत ड्रोन पायलट म्हणून करिअर करण्याची मोठी संधी तरुणांना आहे.

There is a great opportunity for the youth to make a career as a drone pilot. To become a drone pilot, only 2 months to 3 months of training is required :

ड्रोन पायलट बनण्यासाठी फक्त 2 महिने ते 3 महिन्यांचं प्रशिक्षण आवश्यक आहे. अशा परिस्थितीत एखाद्याला ड्रोन पायलट म्हणून उत्तम करिअर करायचं असेल, तर त्याला या घडीला मोठी संधी आहे. जाणून घेऊया याबद्दल. ड्रोन पायलटची काय माहिती ड्रोन पायलट बनण्यासाठी पात्रता काय आहे, ड्रोन पायलट बनल्यानंतर कोणत्या वेबसाइटवरून प्रशिक्षण कुठून घेता येईल आणि किती पगार मिळेल याची माहिती येथे दिली आहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली माहिती :
येत्या काही वर्षात देशाला जवळपास 1 लाख ड्रोन पायलटची गरज भासणार असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. नीती आयोगाच्या एका कार्यक्रमात बोलताना सिंधिया यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्र सरकारची १२ मंत्रालये सध्या देशात ड्रोन सेवेची मागणी वाढवण्यावर काम करत आहेत. ही मागणी खूप वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत काही वर्षात देशाला जवळपास 1 लाख ड्रोन पायलटची गरज भासेल अशी अपेक्षा आहे.

ड्रोन पायलट बनण्याची शैक्षणिक पात्रता :
जर कुणाला ड्रोन पायलट बनायचं असेल तर फक्त बारावी पास हीच एक अट असेल, असं नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. कॉलेजच्या डिग्रीचीही गरज नाही. ड्रोन पायलटचे प्रशिक्षण केवळ बारावी उत्तीर्ण होऊनही घेता येते.

जाणून घ्या किती दिवसात तुम्ही ड्रोन पायलट बनू शकता :
नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मते, जर कुणाला ड्रोन पायलटचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर फक्त दोन-तीन महिन्यांचं प्रशिक्षण आवश्यक आहे. या प्रशिक्षणानंतर एखादी व्यक्ती ड्रोन पायलट बनू शकते. हे प्रशिक्षणही अगदी सोपे आहे.

दर महिन्याला ड्रोन पायलट किती कमाई करू शकतात:
नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मते ड्रोन पायलट बनल्यानंतर महिन्याला ३० हजार रुपयांपर्यंत पगार सहज मिळू शकतो. मात्र, काही प्रकारचे ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण दिले आहे का, यावर ते अवलंबून असेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.बुधवार

News Title: Drone Pilot Naukri after training from Indian government check details here 11 May 2022.

हॅशटॅग्स

#Drone Pilot Naukri(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x