15 January 2025 5:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

EVM Machine | मी टेक्नॉलॉजिस्ट आहे, EVM मशीनने निवडणुकीत घोटाळा करता येतो, ही यंत्रे विशिष्ट ठिकाणी वापरली जातात

EVM Machine

EVM Machine | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी निवडणूक प्रक्रियेत मतपत्रिकेचा वापर करण्याचे समर्थन केले आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मस्क यांनी अमेरिकेतील मतदान यंत्रांच्या (EVM) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, यामुळे निवडणुकीत घोटाळा होऊ शकतो.

ही यंत्रे विशिष्ट ठिकाणी वापरली जातात
एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, मस्क यांनी पेन्सिल्व्हेनियातील एका टाऊन हॉलमध्ये बोलताना दावा केला होता की, डोमिनियन नावाच्या मतदान यंत्रांनी निवडणूक निकालात घोटाळा केला आहे. या मशिनच्या वापरामुळे फिलाडेल्फिया आणि अ‍ॅरिझोनामध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला आहे. ही यंत्रे विशिष्ट ठिकाणी वापरली जातात, हा योगायोग आहे का, असा सवाल मस्क यांनी आपल्या भाषणात केला.

केवळ मतपत्रिकेचा वापर करण्याचे समर्थन
मस्क यांनी निवडणुकीत केवळ मतपत्रिकेचा वापर करण्याचे समर्थन करत मतमोजणी हाताने करावी, असे सांगितले. अमेरिकेतील राज्यांनी या दिशेने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.

मस्क यांच्या राजकीय भूमिकेबद्दल बोलायचे झाले तर ते माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक मानले जातात. ट्रम्प यांच्या निवडीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय कृती समितीला ७५ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे.

मी टेक्नॉलॉजिस्ट आहे – एलॉन मस्क
कार्यक्रमा दरम्यान एलॉन मस्क म्हणाले, ‘मी टेक्नॉलॉजिस्ट आहे आणि मला कॉम्प्युटरबद्दल बरीच माहिती आहे. मला वाटते की संगणक प्रोग्रामवर अवलंबून राहणे धोकादायक आहे कारण ते हॅक करणे खूप सोपे आहे.

यापूर्वी डोमिनियन व्होटिंग मशिन कंपनीने फॉक्स न्यूजवर मानहानीचा खटला दाखल केला होता आणि कंपनीवर मत घोटाळ्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. मस्क यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रियेची चर्चा आणखी वाढली आहे.

जूनमध्येही ईव्हीएमवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते
यावर्षी जूनमहिन्यात एलन मस्क यांनी भारतात लोकसभा निवडणुका सुरू असताना ईव्हीएम हॅक होऊ शकतात, असे म्हटले होते. तेव्हा काँग्रेसने हा महत्त्वाचा मुद्दा बनवला, त्याला उत्तर देताना भाजपचे चंद्रशेखर यांनी भारतात वापरली जाणारी ईव्हीएम इंटरनेटशी जोडलेली नाहीत, त्यामुळे ती हॅक करता येणार नाहीत, असे विधान केले. ते इंटरनेटशी जोडले असते तर ते हॅक होणे शक्य झाले असते,’ असे सांगून ते म्हणाले की, या वक्तव्यानंतर हे प्रकरण दडपले गेले, पण आता पुन्हा एकदा ईव्हीएम हॅकिंगचा विषय चर्चेत आला आहे.

Latest Marathi News | EVM Machine 20 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EVM Machine(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x