3 December 2024 10:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Facebook Updated Policy | पत्रकार, नेते आणि सेलिब्रिटींची खिल्ली उडवणे महागात पडणार | अकाउंट बॅन होणार

Facebook Updated Policy

मुंबई, १४ ऑक्टोबर | फेसबुकने त्यांच्या पॉलिसीत महत्वाचे बदल केले आहेत आणि ते युझर्सनी समजून घेणे अत्यंत महत्वाचं आहे, अन्यथा त्यांचं अकाउंट बॅन होण्याची शक्यता आहे. त्यानुसार फेसबुकच्या नव्या पॉलिसीनुसार (Facebook Updated Policy) आता सेक्शुअल कंटेंट पोस्ट करणाऱ्या खात्यांवर बंदी घालणार आहे. या पॉलिसी अंतर्गत जर एखाद्या वापरकर्त्याने सेलिब्रिटी, राजकारणी, क्रिकेटपटू आणि पत्रकार अशा पब्लिक फिगर व्यक्तींना लक्ष्य केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यामध्ये, वापरकर्त्याचे प्रोफाइल, पेज, संबंधित ग्रुप किंवा इव्हेंट कायमचा काढून टाकला जाईल.

Facebook Updated Policy. According to Facebook’s new policy, accounts that post sexual content will now be banned. Under this policy, if a user targets public figures such as celebrities, politicians, cricketers and journalists, action will be taken against them :

समाज माध्यमांवर अनेक युझर्स बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटपटू आणि राजकारणी यांचे मीम्स बनवतात आणि शेअर करतात. आता असे विनोद करणे लोकांना महागात पडू शकते. फेसबुकचे ग्लोबल सेफ्टी हेड अँटीगोन डेव्हिस यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, जे यूजर्स लोकांची प्रतिमा खराब करतात आणि ऑनलाईन त्रास देतात त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कंपनीने धोरण बदलून सार्वजनिक व्यक्ती आणि इंडिविजुअल यांच्यातील फरक हायलाइट केला आहे, जेणेकरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची योग्य अंमलबजावणी करता येईल.

फेसबुक सामूहिकरित्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या पोस्ट काढून टाकेल. यासह, इनबॉक्समध्ये थेट संदेश पाठवण्याचे नियम देखील बदलले जातील. कंपनी प्रोफाइल आणि पोस्टवर कमेंटला सिक्योर करेल. फेसबुकने म्हटले आहे की, सेलिब्रिटी आणि नामांकित लोकांची लिस्ट बनवली जाईल, ज्यामुळे त्यांना ऑनलाइन त्रासापासून वाचवले जाऊ शकेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Facebook Updated Policy on virtual attacking journalists politicians and celebrities.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x