18 January 2025 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

फेसबुकवर न्यूजसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार

Facebook, Facebook News Section, Facebook News tab, mark zuckerberg

मुंबई: फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात घडणाऱ्या घडामोडींची बरीचशी माहिती युजर्स फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या बातम्यांमधूनच मिळते. दरम्यान, देशभरातील विविध प्रसार माध्यमं फेसबुकचा वापर करून स्वतःच्या पोर्टलवरील बातम्या जास्तीत जास्त ग्राहकांकडे पोहोचवतात. मात्र देशभरात इतके स्थानिक आणि इंग्रजी भाषेतील न्युज चॅनेल्स आणि पोर्टल्स आहेत की युजर्स प्रत्येक पोर्टल किंवा चॅनेलला फॉलो करतंच असेल असं नाही.

त्याअनुषंगाने आता स्वतः फेसबुकने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कारण हेच लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आपल्या युजर्ससाठी एक नवनवीन फीचर आणत आहे. फेसबुकवर लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन सर्व्हिस सुरू लाँच करणार आहे. युजर्सना आता फेसबुकवर नवा न्यूज सेक्शन मिळणार आहे. त्या न्यूज सेक्शनमध्ये जगभरातील प्रसार माध्यमाच्या सर्व बातम्या या युजर्सना एकाच ठिकाणी पाहाता येणार आहेत. तत्पूर्वी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकमध्ये लवकरच एक न्यूज टॅबचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध केली होती.

Facebook CEO Mark Zuckerberg arrives to testify before a joint hearing of the Commerce and Judiciary Committees on Capitol Hill in Washington, Tuesday, April 10, 2018, about the use of Facebook data to target American voters in the 2016 election. (AP Photo/Andrew Harnik)

न्यूज सेक्शन या नव्या सर्व्हिससाठी फेसबुक न्यूज प्रोव्हाईड करणाऱ्या वेबसाईट आणि एजन्सीसोबत सविस्तर चर्चा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरून न्यूज सेक्शन सुरू करण्यासाठी जगभरातील प्रमुख मीडिया कंपन्यांशी चर्चा सुरू केल्याचे वृत्त आहे. यामध्ये न्यूयॉर्क पोस्ट, वॉशिंग्टन पोस्ट, समाचार कॉर्प सारख्या मीडिया हाऊस आणि काही पब्लिकेशन्स देखील त्यात समाविष्ट आहेत. परंतु फेसबुकने याबाबत कोणतीही माहिती सध्या सार्वजनिक केलेली नाही नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे अधिकृत वृत्त दिले आहे.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x