18 January 2025 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा ITR Filing | या लोकांना पैसे कमावून सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही, इन्कम टॅक्सही कृपा करतो, फायदा जाणून घ्या Business Idea | स्वतःचा उद्योग सुरु करा रतन टाटा यांच्यासोबत, 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळेल, महिना लाखोत कमाई होईल Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

इस्रोने शेअर केली चंद्रयान-२ द्वारे काढलेली पृथ्वीची पहिली छायाचित्रे

Chandrayan 2, Earth

मुंबई : २२ जुलै २०१९ रोजी चंद्रयान-२ आपल्या मोहिमेवर रवाना झाल्यानंतर काही दिवसातच सोशल मीडियावर काही खोटी छायाचित्रे वायरल होणे सुरु झाले होते. हि छायाचित्रे चंद्रयान-२ द्वारे काढण्यात आल्याचा दावा केला जात होता. पण आता इस्रोनेच चंद्रयान-२ द्वारे काढलेली पृथ्वीची पहिली छयाचित्रे ट्विटरवरून लोकांपर्यंत पोहोचवली आहेत. चंद्रयान-२ च्या विक्रम लँडरच्या एलआय ४ कॅमेराद्वारे हि छायाचित्रे काढण्यात आली आहेत.

जुलैच्या अखेरीस चंद्रयान-२ योग्य वाटचालीकडे जात असल्याचे इस्रोच्या बंगळुरू मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. इस्रो सध्या चंद्राच्या दक्षिण द्रव प्रदेशात लँडर (अवकाशयान) च्या लँडिंगसाठी लक्ष केंद्रित करत आहे. जिथे कोटही देश अद्याप गेलेला नाही. देशातील महत्वकांक्षी कमी किमतीच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक मोठी झेप, सर्वात शक्तिशाली तीन चरण रॉकेट जीएसएलव्ही-एमकेआयआयआय-एम १ ने २२ जुलै २०१९ ऐवजी आंध्रप्रदेश श्रीहरीकोटा येथील स्पॉसपोर्ट येथून पृथ्वीच्या कक्षेत अंतराळ यान सोडले होते. ते हळूहळू आता आपले टप्पे पार करत आपली कामगिरी छायाचित्रांच्यामार्फत भारतापर्यंत पोहोचवत आहे.

नुकतेच चंद्रयान-२ ने तिसरी पृथ्वी कक्षा वाढवण्याचे कौशल्य यशस्वीरित्या पार पाडले आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात रोव्हर सॉफ्ट लँडिंगचे नियोजन करून चंद्रयान-२ येत्या आठवड्यात चंद्राच्या परिसरापर्यंत नेण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x