7 January 2025 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, रेटिंग जाहीर, टार्गेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, तिकीट बुकिंगवर मिळणार 50% डिस्काउंट, अशा पद्धतीने तिकीट बुकिंग करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट, महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या Home Loan Interest Rates | नवीन घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार, 2025 वर्षातील खास होम-लोन व्याज दर इथे जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK IRFC Share Price | 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला IRFC शेअर, आता तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Penny Stocks | 6 रुपयाचा पेनी शेअर खरेदीसाठी गर्दी, सुसाट वेगात कमाई, यापूर्वी 776% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

ऑनलाईन जाहिरात क्षेत्रातील प्रबळ स्थानाचा गैरवापर | फ्रान्समध्ये Google'ला 1953 कोटींचा दंड

Google

पॅरिस, ०८ जून | आयटी क्षेत्रातील गूगल कंपनीने जगभर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. जगातील सर्वात जास्त डाटा गूगल कंपनीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या कंपनीचं जगभर एकतर्फी वर्चस्व निर्माण झालं आहे. सध्याच्या आधुनिक जगात गुगलशिवाय जगणं कठीण बनलं आहे. अशातच फ्रान्सने गुगलला तब्बल 1953 कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे. फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन रेग्युलेटरने गूगलवर ही कारवाई केली आहे. ऑनलाईन जाहिरातींच्या बाजारपेठेत नियम डावलून एकतर्फी वर्चस्व निर्माण केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन गूगलला 22 कोटी यूरो अर्थातच 1953 कोटी रुपये एवढा मोठा दंड केला आहे. खरंतर मागील काही वर्षांपासून युरोपमध्ये अमेरिकन आयटी कंपन्यांचं वर्चस्व वाढत आहेत. त्यामुळे युरोपातील अन्य लघु आणि मध्यम स्वरुपाच्या कंपन्यांवर खूप मोठा दबाव निर्माण झाला आहे. अशातच ऑनलाईन जाहिरातीच्या बाबतीत बाजारपेठेच्या प्रबळ स्थानाचा गैरवापर केल्याच्या कारणावरून फ्रान्सच्या मार्केट नियामकाने सोमवारी गूगलला हा दंड ठोठावला आहे.

फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन रेग्युलेटरने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, Google च्या जाहिरातीच्या पद्धती भयानक आहेत. कारण गूगल बाजारातील त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि मोबाइल साइट्सच्या प्रकाशक आणि अनुप्रयोग युनिट्सवर दंडात्मक कारवाई करत आहेत. संबंधित निवेदानात पुढे म्हटलं आहे की, एक प्रमुख बलाढ्य आणि वर्चस्व असणाऱ्या कंपनीची एक जबाबदारी असते की ते इतरांच्या हिताकडे दुर्लक्ष करणार नाही. पण Google च्या सेवा विविध पद्धती वापरुन प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध अन्यायकारकपणे स्पर्धा करत आहेत.

 

News English Summary: The IT company Google has established its dominance in the world. Google has the most data in the world. As a result, the company has unilaterally dominated the world. In today’s modern world it is difficult to live without Google. It is learned that France has fined Google Rs 1,953 crore.

News English Title: France has fined Google 1953 crore fine over programmed ads market misuse news updates.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x