21 February 2025 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

अनेक देशांमध्ये Gmail डाउन | ई-मेल सेंड होत नसल्याने युजर्स त्रस्त

Gmail Down, Users Report, Unable To Send Emails

नवी दिल्ली, २० ऑगस्ट : गुगलच्या ‘जीमेल’चं (Gmail) सर्व्हर डाउन झालं आहे. परिणामी भारतासह अनेक देशांमध्ये युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सना ई-मेल पाठवता येत नाहीयेत. तर, काही युजर्सनी अटॅचमेंट फेल होण्याची तक्रार सोशल मीडियावर केली आहे.

गेल्या तासाभरापासून जी-मेलची सेवा ठप्प आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडतो आहे. जी-मेलसोबतच गुगल ड्राईव्हमध्येही तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना फाईल शेअर करताना अडचणी येत आहेत. याशिवाय फाईल अपलोड आणि डाऊनलोड करणंही कठीण जात आहे. गुगलची इंजिनियरिंग सध्या यावर काम करत आहे. मात्र ही समस्या नेमकी कधीपर्यंत दूर होईल, याची माहिती गुगलकडून देण्यात आलेली नाही.

ई-मेल पाठवताना आणि फाइल्स अटॅच करताना बहुतांश युजर्सना अडचणी येत आहेत. काही युजर्स गुगल ड्राइव्ह, गुगल डॉक यांसारख्या G suite सेवा वापरतानाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं आहे. पण, सर्वाधिक समस्या जीमेल वापरणाऱ्यांना होत आहे. जगभरात लाखो लोकं जीमेलचा वापर करतात.

 

News English Summary: Gmail down for several users. The email service is not working globally. Users are complaining that they are unable to send across emails and attach files to emails. We tried to send an email with attachment and Gmail showed error. (check image below). It has been over an hour that people across the world are facing this issue.

News English Title: Gmail Down Users Report Being Unable To Send Emails And Upload Attachments News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Google(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x