गुगल आणि फेसबुकवर पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्यांचा डेटा असा ट्रक केला जातो - नक्की माहिती घ्या

मुंबई, १५ जुलै | जर तुम्ही ऑनलाईन पॉर्न पाहत असाल आणि याबाबत कोणालाही माहिती नाही असं समजत असाल तर तुम्ही अज्ञानी आहात. जगभरात लाखो अशा पॉर्न वेबसाईट्स आहे, ज्या आपल्या युजर्सची माहिती गुगल आणि फेसबुकसह इतर टेक कंपन्यांशी शेअर करतात. असं युजर्सची ऑनलाईन अॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी केलं जातं. एवढंच नाही, तर तुम्ही तुमच्या कंप्यूटर, लॅपटॉपमध्ये Incognito मोडमध्ये पॉर्न पाहत असाल, तर ही अॅक्टिव्हिटीही ट्रॅक केली जाते.
22 हजारहून अधिक पॉर्न साईट्स स्कॅन:
मायक्रोसॉफ्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेन्नसिलवॅनिया अँड कार्नेगी मेलॉनच्या रिसर्चर्सने एका रिपोर्टमध्ये सांगितलं, की त्यांनी जगभरात 22,484 अडल्ट कॉन्टॅक्ट असणाऱ्या वेबसाईट्स स्कॅन केल्या आहेत. या सर्व साईट्स युजर्सचा डेटा पुढे फॉर्वर्ड करत असल्याचं आढळलं आहे. अॅनालिस्ट्सनी असंही सांगितलं, की यापैकी 93 टक्के वेबसाईट्स अशा आहेत, ज्या थर्ड पार्टी कंपन्यांच्या जवळपास सात डोमेनसह युजर्सचा डेटा शेअर करत आहेत. या रिपोर्टमध्ये केवळ 17 टक्के वेबसाईट्स अशा आहेत, ज्या एनक्रिप्शनचा वापर करतात असंही सांगण्यात आलं.
गुगल, फेसबुक:
या 93 टक्के वेबसाईट्समध्ये 74 टक्के पॉर्न वेबसाईट्स अशा होत्या ज्यांना गुगल आणि त्यांच्या कंपन्या ट्रॅक करत होत्या. सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी ऑरेकलनेही 24 टक्के पॉर्न साईट्स ट्रॅक केल्याचं आढळलं आहे. युजर्सकडून सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकही रिसर्चर्सच्या स्कॅनिंगमध्ये प्रत्येकी 10 पैकी एका पॉर्न साईटचं ट्रॅकिंग करताना आढळलं आहे.
प्रायव्हसी पॉलिसी:
रिसर्चर डॉ. मॅरिस यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या माहितीत सांगितलं, की पॉर्न साईट्सवर युजर्सला ज्याप्रमाणे ट्रॅक केलं जातं, त्यानुसार ऑनलाईन रिटेलमध्ये युजर्सच्या प्रायव्हसीला किती धोका आहे, हे समजू शकतं. युजर्सची अशी खासगी बाब ट्रॅक करणं योग्य नसून त्या युजरला हे माहितीच नाही, की त्यांना टेक कंपन्यांकडून ट्रॅक केलं जात आहे. जगभरात केवळ 17 टक्के पॉर्न साईट्स प्रायव्हसी पॉलिसी फॉलो करतात.
या डेटाचं काय होतं?
युजर्सचं ट्रॅकिंग करुन जमा केलेल्या डेटाचं नेमकं काय होतं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. परंतु रिसर्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, गुगल आणि फेसबुक पॉर्नोग्राफी वेबसाईट्ससाठीचा वापर केलेल्या युजरचा डेटा अॅडव्हर्टायजिंग प्रोफाईल डेव्हलप करण्यासाठी वापर करत असाव्या.
कसा ट्रॅक होतो तुमचा डेटा?
ऑनलाईन ट्रॅकिंगमध्ये अशा युजर्सला अधिक ट्रॅक केलं जात, जे एखादी वेबसाईट दररोज पाहतात. ट्रॅकिंगसाठी कंपन्या वेबसाईटवर लहान टेक्स्ट फाईल आणि कुकीज देतात, ज्या साईट व्हिजिट दरम्यान युजरच्या डिव्हाईसवर डाउनलोड होतात. डाउनलोड झालेल्या या फाईल युजरला एखाद्या साईटवर लॉगइन ठेवण्यासह त्यांचे प्रेफरन्स ओळखून जाहिराती दाखवण्याचं काम करतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Google and Facebook track online porn watching of users data is true of fake news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA