YouTube | मुलं मोबाईलचा गैरवारप तर करत नाहीत ना? | पालकांसाठी नवं फीचर लाँच
मुंबई, २७ फेब्रुवारी: अमेरिका स्थित तब्बल २३ संस्थांनी यूट्युबविरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे एप्रिल २०१८ मध्ये तक्रार दाखल केल्याने अमेरिकेत खळबळ माजली होती. यूट्युबवर व्हिडीओ पाहणाऱ्या १३ वर्षाखालील लहान मुलांची माहिती ‘यूट्युबवर’ म्हणजे गुगलकडून गोळा केली जाते. या माहितीत फोन क्रंमांक, मुलांचे लोकेशन आणि डिव्हाईसची माहिती गुगलकडून गोळा केली जात असून त्यांचा आधार घेऊन त्यांना इतर संकेतस्थळांवर ट्रॅक केले जाते तसेच अशा प्रकारची माहिती गोळा करताना मुलांच्या वयानुसार पालकांकडून परवानगीदेखील घेतली जात नाही असं या संस्थांचं म्हणणं होतं.
त्यामुळे गुगल कंपनीकडून अमेरिकेतील चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्टचे उल्लंघन होत असल्याचे तक्रारदार संस्थांचे म्हणणे होते. वास्तविक तो गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग होता, मात्र वापरकर्त्यांच्या हक्कांचा भंग करणारा होता. मात्र त्यानंतर लहान मुलं आणि पालक यांच्यात ताळमेळ राहावा आणि आपली मुलं युट्यूब वापरताना त्याचा गैरपवर तर करत नाहीत ना यावर लक्ष ठेवण्यासाठी युट्यूबने पालकांसाठी विशेष फीचर्स आणले आहेत. नव्या फीचरसाठी कंपनी तीन वेगवेगळ्या सेटिंग्स जारी करेल. सूपर्वाईज्ड गुगल अकाउंट या तीन सेटिंग्स एडजस्ट करण्यासाठी पालकांना देईल.
Explore (एक्सप्लोर):
ही सेटिंग त्या मुलांसाठी आहे ज्यांचं वय 9 वर्षाहून अधिक आहे. या सेटिंगच्या व्हिडीओमध्ये व्लॉग्स, ट्यूटोरियल, गेमिंग, व्हिडीओज, म्यूजिक क्लिप, न्यूजचा समावेश असेल.
Explore more (एक्सप्लोर मोअर):
ही सेटिंग 13 वर्षाहून अधिक वयोगटासाठी आहे. ही सेटिंग इनेबल केल्यावर व्ह्यूवर्सकडे व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. या कॅटेगरीमध्ये लाईव्ह स्ट्रीमही अॅक्सेस करता येईल.
Most of YouTube (मोस्ट ऑफ यूट्यूब):
या सेटिंगमध्ये मुलं यूट्यूबवर जवळपास सर्वच व्हिडीओ पाहू शकतील. मुलं केवळ Age Restrictions वाले संवेदनशील व्हिडीओ पाहू शकणार नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
News English Summary: In April 2018, 23 US-based organizations filed a complaint against YouTube with the US Federal Trade Commission. Google collects information about children under the age of 13 who watch videos on YouTube. The information includes phone numbers, children’s location and device information collected by Google and tracked on other websites based on them, and the parents’ permission is not taken into account when collecting such information, according to the children’s age.
News English Title: Google owned YouTube brings supervised account children here what parents need know news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो