5 November 2024 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख
x

तुम्ही एक क्लिक करता आणि Google सर्व माहिती शोधून देते? | कसं होतं हे? - नक्की वाचा

How Google search your required result

मुंबई, १२ जुलै | गुगल हे जगातील माहितीचं सर्वात मोठं ऑनलाईन जग आहे. येथे करोडो गोष्टी एक क्लिकवर जगभरातून शोधल्या जातात. त्यात आज प्रत्येक हातात मोबाईल आल्याने त्याचं प्रमाण न मोजण्यापलीकडे गेलं आहे. या माहिती जाळ्यात जशा चांगल्या तशा नुकसान करणाऱ्या देखील लाखो गोष्टी आहेत. त्यात आजकाल प्रत्येकजण कोणत्याही गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी गूगल सर्च इंजिनचा वापर करतो. गुगलवर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे अचूक परिणाम मिळतात.

जगातील सर्वात मोठा माहितीचा स्रोत म्हणजे गुगल सर्च. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसेल आणि आपण गुगल सर्च केलं तर अवघ्या एक सेकंदात आपल्यासमोर त्याबद्दलचे शेकडो रिझल्ट्स असतात. एवढंच नाही तर त्याच्याशी निगडित गोष्टींचीही अचूक माहिती गुगलकडून मिळते. एका रिपोर्टनुसार एका दिवसात गुगलवर तब्बल ५.६ बिलियन म्हणजेच ५६० कोटी सर्च असतात. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात येत असूनही नेमकं तुमच्या प्रश्नाचं उत्तर गुगलकडून इतक्या कमी वेळात मिळतं तरी कसं? याचबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

क्रॉलिंग (Crawling):
ही एक सतत चालू राहणारी प्रोसेस आहे. Google सतत त्यामधले पेजेस क्रोल करत असतो आणि त्यामध्ये नवीन पेजेस जोडत असतो. यासाठी Google Bot नावाच्या एका सॉफ्टवेअरची मदत घेतली जाते. या सॉफ्टवेअरच्या मदतीनं कोणतं पेज पहिले शो करायचं आहे, कोणती माहिती समोर दाखवायची आहे हे गुगलकडून ठरवण्यात येतं. म्हणूनच आपण काही सर्च केल्यानंतर आपल्याला अगदी आपल्या मनासारखी माहिती मिळते.

या गोष्टींवर असते Crawling अवलंबून:
गुगल कोणत्याच वेबसाईटकडून क्रॉलिंगचे पैसे घेत नाही. मात्र क्रॉलिंग प्रोसेस सुरळीत पार पाडण्यासाठी तुमच्या वेबसाईटचं URL, वेबसाईटचं नाव तसंच तुमच्या वेबसाईटला होमपेज असणं आवश्यक आहे. क्रॉलिंग प्रोसेस याच गोष्टींवर अवलंबुन असते.

इंडेक्सींग (Indexing):
google crawling नंतर Indexing ही प्रोसेस होते. यात गुगलकडून वेबपेजचं कन्टेन्ट चेक करण्यात येतो. आपण केलेल्या सर्चमध्ये इमेजेस आणि व्हिडीओ जोडले जातात. तसंच तुमच्या सर्चशी निगडित काही बातम्या असतील, जागा असतील तर ते जोडले जातात. ही सर्व माहिती google Index मध्ये सेव्ह केली जाते. म्हणूनच गुगलनं तुमच्या पेजला प्राधान्य द्यावं यासाठी आपल्या पेजचं टायटल नेहमी लहान ठेवा.

सर्व्हिंग रिझल्ट्स (Serving Result):
जेव्हा आपण एखादी गोष्ट गुगलवर सर्च करतो तेव्हा तुमच्या प्रश्नानुसार गुगल रिझल्ट्सची पेज रँकिंग ठरवतो. गुगलमध्ये स्टोर असलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला रिझल्ट्स मिळतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How Google search your required result within a second details in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Google(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x