23 February 2025 2:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

तुमच्या आधारकार्डवर कुणी सिमकार्ड घेतलंय का? | अशा प्रकारे चेक करा - वाचा आणि शेअर करा

SIM Card and Aadhaar card

मुंबई, २४ जून | एका आधार कार्डच्या मदतीने 18 सिम कार्ड घेता येऊ शकतात. त्यामुळे एखाद्याला माहिती न होता त्याच्या आधार कार्डवर सिम कार्ड घेतले जाण्याची शक्यता वाढते. जर आपल्याला अशा परिस्थितीत हे शोधायचे असेल की आपल्या आधार कार्डवरून दुसऱ्या कोणी सिमकार्ड घेतले आहे का? तर तुम्ही ते सहज शोधू शकता. आधार कार्डवर किती सिमकार्ड घेण्यात आले आहेत याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, यापूर्वी एका आधारकार्डवर नऊ सिमकार्ड खरेदी करता येत होते. पण आता 18 सिमकार्ड एका आधार कार्डवर खरेदी करता येतात. ज्या लोकांना बिजनेसमुळे अधिक सिमकार्डची गरज असते, त्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नऊऐवजी ही संख्या 18 सिमपर्यंत वाढवण्यात आली आहे.

अशा प्रकारे शोधा आपल्या आधार क्रमांकावर किती सिमकार्ड रजिस्टर आहेत ?
* आधार कार्डशी किती नंबर लिंक आहेत हे शोधण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
* हे जाणून घेण्यासाठी, आधार वेबसाईट यूआयडीएआयला (UIDAI) भेट द्या.
* यानंतर होम पेजवर Get Adhaar वर क्लिक करा.
* त्यानंतर Download Adhaar वर क्लिक करा.
* आता तिथे View More पर्यायावर क्लिक करा.
* येथे Adhaar Online Service वर जाऊन Aadhaar Authentication History वर जा.
* आता येथे Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
* येथे एक नवीन इंटरफेस ओपन होईल. आता आपला आधार नंबर येथे टाईप करा आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि ओटीपीवर क्लिक करा.
* आता येथे Authentication Type वर All सिलेक्ट करा.
* आता तुम्हाला तिथे कालावधी ठरवण्यासाठी तारीख भरावी लागेल.
* आता येथे ओटीपी टाकून वेरिफाय ओटीपी वर क्लिक करा.
* असे केल्यावर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल.
* येथून आपण आपल्या डिटेल्स मिळवू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: How to check if someone got a SIM Card on your Aadhaar card news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x