4 January 2025 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

आता RTO मध्ये चाचणी न देताही मिळू शकेल ड्रायव्हिंग लायसन्स | कसे ते जाणून घ्या

driving license

मुंबई, ११ जून | आपण ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याचा विचार करीत असाल तर RTO मध्ये होणारी ड्रायव्हिंग टेस्ट टाळायची असेल तर तुमच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच लोकांना RTO मध्ये ड्रायव्हिंग चाचणी शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल. त्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयाने मान्यता दिलेल्या ड्रायव्हिंग टेस्ट सेंटरकडून ट्रेनिंग घ्यावे लागेल, त्यानंतर केंद्राकडून प्रमाणपत्र मिळेल. त्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स घेताना चाचणी देण्याची गरज भासणार नाही. ही अधिकृत टॅनिंग सेंटर्स 1 जुलै 2021 पासून सुरू होतील. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात दरवर्षी होणाऱ्या अपघातांचे एक कारण म्हणजे ट्रेंड चालकांचा अभाव.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सध्या देशात 22 लाख वाहनचालकांची कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वांनुसार देशभरात ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मंत्रालयाच्या मानकांनुसार लोकं ही सेंटर्स उघडू शकतात, ज्यामध्ये लोकांना ट्रेनिंग दिले जाऊ शकते. ट्रेनिंग घेतल्यानंतर टेस्ट घेतली जाईल. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना हे प्रमाणपत्र देईल, त्या आधारे टेस्ट न देता ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल.

चालक ट्रेनिंग सेंटरसाठीच्या अटी:
ट्रेनिंग सेंटरसाठी मैदानात दोन एकर आणि डोंगराळ भागात एक एकर जागेची आवश्यकता असेल. एलएमव्ही आणि एचएमव्ही दोन्ही वाहनांसाठी सिम्युलेटर अनिवार्य असेल, ज्याद्वारे ट्रेनिंग दिले जाईल. येथे बायोमेट्रिक अटेंडेंस आणि इंटरनेटसाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आवश्यक असेल. पार्किंग, रिव्हर्स ड्रायव्हिंग, डाउनहिल ड्रायव्हिंग इत्यादी ट्रेनिंग देण्यासाठी ड्रायव्हिंग ट्रॅक अनिवार्य असेल. यामध्ये थिअरी आणि सेगमेंटेशन कोर्स असतील. केंद्रातील सिम्युलेटरच्या मदतीने हायवे, ग्रामीण भागात गर्दी आणि लेन असणाऱ्या ठिकाणी पाऊस, धुके तसेच रात्री वाहने चालविण्याचे ट्रेनिंग दिले जाईल.

 

News Summary: If you are thinking of getting a driving license, this is good news for you if you want to avoid driving test in RTO. Soon people will be able to get driving license in RTO without driving test. For this, you have to take training from a driving test center approved by the Ministry of Road Transport, after which you will get a certificate from the center. Based on that, there will be no need to take a test while getting a driving license. These official tanning centers will start from July 1, 2021. The Ministry of Road Transport has issued orders in this regard. According to the Ministry of Road Transport, one of the causes of accidents in the country every year is the lack of trained drivers.

News Title: How to get driving license without RTO exam news updates.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x