22 November 2024 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

तुमचा मोबाईल कॉल रेकॉर्ड होतोय? | जाणून घ्या कसं चेक करायचं

Mobile call, Recording, Third party

मुंबई, ०८ मार्च: अनेक वेळा आपल्या कॉल रेकॉर्डिंगचा गैरवापरही केला जातो. प्रथम हे लक्ष ठेवायला हवे की, कोणीही तुमच्या मंजुरी शिवाय, कॉल रेकॉर्ड करणे ही एक चोरी आहे. कोणत्याही व्यक्तीसोबत बोलणे किंवा त्याच्या परवानगी विना रेकॉर्ड करणे हे कलम २१ च्या विरुद्ध आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या प्रायव्हसीला सन्मान देणे गरजेचे आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानंतर संविधानचे कलम २ नुसार जीवनाचे मूलभूत अधिकारात प्रायव्हसी हे व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग आहे. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीची पर्सनल कॉल रेकॉर्डिंग करणे नियम मोडण्यासारखे आहे. (How to identify that our mobile call is recording done by third party)

सरकारी एजन्सीकडून असं रेकॉर्डिंग केलं जात असेल तर ते शक्य नाही. सरकारी संस्था टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने कॉल रेकॉर्ड करतात ते समजत नाही. मात्र, इतर कोणी तसं करत असेल तर तुम्हाला ते ओळखता येतं.

जर कोणी कोणाशी बोलत असताना त्याचा कॉल रेकॉर्ड करीत असेल तर ते चुकीचे आहे. कॉलवर बोलत असताना तुमचा कॉल कुणी रेकॉर्ड तर करीत नाही ना यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला कुणाशी बोलत असताना काही सेंकद किंवा मिनिटात बीप सारखा आवाज आला तर समजून जा की, तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे.

काळजीपूर्वक ऐका:
जेव्हा तुम्हाला एखादा कॉल येतो तेव्हा काही सेकंदानंतर जर बीपचा आवाज आला तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे असं समजा. अशा वेळी तुम्ही विचारू शकता.

फोन ओव्हर हिटिंग:
ही एक सर्वसामन्य समस्या असली तरी वारंवार होत असेल तर लक्ष देण्याची गरज आहे. काऱण कॉल रेकॉर्डिंग असंही होऊ शकतं. तुमच्या फोनमध्ये असं एखादं अॅप असतं ज्यामुळे रेकॉर्डिंग इतरत्र पाठवलं जातं. त्यासाठी बॅकग्राउंडला सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे ओव्हर हिटिंगची समस्या निर्माण होते.

डेटा वापर:
तुमचा डेटा कोणत्या गोष्टीसाठी वापरला गेला हे समजतं. तुम्ही वापर केलेला नसतानाही कधी कधी तो संपल्याचं दिसत असेल तर नक्कीच फोनमधील डेटा चोरला जात असण्याची शक्यता असते.

नको असलेली अॅप्स आणि संदेश:
फोनमध्ये लिमिटेड अॅप वापरणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. मात्र अशी अनेक अॅप्स असतात ज्यावर जाहिरातींचा भडिमार असतो. त्या अॅप्समधून बॅकग्राउंड सिस्टिम कॉल रेकॉर्ड करू शकते.

फोन वापरत नसताना स्क्रिन ऑन:
तुमच्या फोनवर कोणतंही नोटिफिकेशन न येता किंवा त्याचा वापर सुरू नसतानाही स्क्रिन ऑन होणं किंवा सायलंट होण्याचे प्रकार होत असतील किंवा सेल्फी कॅमेरा सुरु होत असेल तर तुमच्या फोनमध्ये हेरगिरी केली जात असल्याची शक्यता आहे.

स्विच ऑफ होण्यास वेळ:
फोन शट डाउन करण्याची प्रोसेस तेव्हा पूर्ण होते जेव्हा बॅकग्राउंडचे सर्व अॅप्स बंद होतात. जर कॉल रेकॉर्डिंग किंवा इतर स्पाय अॅप असतील तर मोबाईल बंद होण्यास उशिर लागतो.

विचित्र टेक्स्ट मेसेज:
जर तुम्हाला न समजणारे मेसेज येत असतील ज्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स, सिम्बॉल असतील तर त्यापासून सावध रहा.

अशी घ्या काळजी:
स्मार्टफोनमध्ये असा कोणताही प्रकार आढळला तर तुमच्या फोनमधील अॅप चेक करा. कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना त्यासाठी आपण काय काय परवानगी देतो ते पाहा. त्याशिवाय इतर अॅपमधून कोणती माहिती गोळा केली जाते हेसुद्धा चेक करा. तसेच वरीलपैकी काही समस्या वारंवार येत असतील तर फोनचा बॅकअप घेऊन फॅक्टरी रिसेट करा.

 

News English Summary: Many times your call recording is also misused. The first thing to keep in mind is that it is a theft to record a call without your consent. Talking to any person or recording without his permission is against section 21. That is, everyone’s privacy needs to be respected. After the decision of the Supreme Court of the country, according to Article 2 of the Constitution, privacy is a part of a person’s life. This means that recording any person’s personal call is like breaking the rules.

News English Title: How to identify that our mobile call is recording done by third party news updates.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x