तुमचा चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल कसा शोधाल ? | हे आहेत मार्ग - नक्की वाचा
मुंबई, ०८ जुलै | हल्ली मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. आणि असा हा मोबाईल आपल्या आयूष्याचा महत्वाचा भाग झाला कारण बर्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपण अगदी सहजतेने मोबाईल द्वारे करत असतो जसे की फोन करणे, विडियो कॉल, चॅटिंग, फोटो, विडियो, गाणी ऐकणे, मूवी बघणे आणि बरेच काही.
पूर्वी माणूस कुठे बाहेर गावी जायला निघाला किंवा बाजारात गेला तर त्याच्या काही मौल्यवान वस्तु चोरीला जायच्या किंबगुणा हरवायच्या जसे की पाकीट किंवा खिष्यातील पैसे आणि महिलांमध्ये म्हणाल तर दागिने गळ्यातील मंगळसूत्र. परंतु हल्ली या गोष्टीं पेक्षा मोबाईल चोरीचे किंवा हरवण्याचे प्रमाण वाढले आहे आणि मोबाईल देखील माणसाच्या मौल्यवान गोष्टींपैकी एक झाला आहे.
त्यामुळे असा हा आपला मोबाईल हरवला तर त्याची किंमत किती होती या पेक्षा त्या मध्ये काय काय डाटा होता हे आपल्या डोक्यात येते आणि तेच सर्वात महत्वाचे असते. कारण हल्ली आपण आपल्या मोबाईल मध्ये सर्वच माहिती ठेवत असतो जसे आपले फॅमिली फोटोस म्हणा किंवा इतर खाजगी माहिती म्हणा, काहीजण तर आपल्या एटीएम व ऑनलाइन बँकिंग चे पासवर्ड देखील मोबाईल मध्येच जतन करून ठेवत असतात. मग आपली सर्व कुंडली ज्या मध्ये दडलेली असते असा हा मोबाईल हरवला अथवा चोरीला गेला तर आपला जीव वर – खाली होणारच ना.
या लेखामध्ये आपण हरवलेला मोबाईल शोधणे विषयी माहिती बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात हरवलेला फोन कसा शोधायचा:
हरवलेला फोन कसा शोधायचा/चोरीला गेलेला मोबाईल शोधणे /हरवलेला मोबाईल कसा शोधायचा – सर्व पद्धती:
मित्रांनो हरवलेला फोन कसा शोधायचा हा आपल्याला पडलेला प्रश्न,सोडवण्यासाठी आपल्याला खाली काही आयडिया देत आहोत त्या केल्यास आपल्याला हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल सापडण्यास नक्कीच मदत होईल.
हरवलेला फोन कसा शोधायचा – मार्ग १:
गूगल चे गूगल मॅप हे अॅप्लिकेशन तुम्हाला तुमचा हरवलेला फोन शोधायला मदत करते. या अॅप्प मधील “your timeline” हे फिचर तुमचे चालू पाहिजे ज्या मुळे तुम्हाला तुमचा मोबाईल सापडतो. या फिचर मध्ये तुम्ही कुठे कुठे फिरला आहात चालत असो किंवा गाडीवर असो तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणांना भेटी दिल्या आहेत तो सर्व डाटा या ठिकाणी स्टोअर झालेला असतो. याचा वापर तुम्ही मोबाईल शोधण्यासाठी करू शकता.
गूगल मॅप चे your timeline फीचर
जर तुमचा मोबाईल/फोन हरवला / चोरीला गेला त्यावेळी तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेट चालू असेल आणि तुम्ही गूगल मॅप ची “your timeline” ही सर्विस आधी पासून चालू करून ठेवली असेल तर तुम्ही कम्प्युटर वर अथवा लॅपटॉप वर तुमच्या गूगल अकाऊंट मध्ये लॉगिन करून, गूगल च्या मॅप च्या या “your timeline” वर गेलात तर तुम्हाला तुमचा मोबाईल कोणत्या कोणत्या ठिकाणी गेला आहे हे दिसेल तसेच जर तुम्ही बघत आहात त्या वेळी देखील तुमच्या मोबाईल चे इंटरनेट चालू असेल तर त्याचे करेक्ट लोकेशन तुम्हाला माहिती होऊ शकते. जरी त्या क्षणाला इंटरनेट बंद असेल तरी तुमचा मोबाईल हरवल्या नंतर शेवटचा कोणत्या लोकेशन ला होता एवढे तर तुम्हाला नक्की कळेल.
त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल आपल्यावर मोबाईल हरवल्यावर पचतावा करण्याची वेळ येऊ नये तर मग तुम्ही तुमच्या मोबाईल मधील गूगल मॅप या अॅप मध्ये जाऊन your timeline हे फिचर चालू करा,जेणे करून चुकून कधी तुमचा मोबाईल/फोन कुठे विसरला किंवा हरवला अथवा चोरीला गेला तर वरील पद्धतीने तुम्ही तो लगेच शोधू शकता.
मोबाईल हरवला कसा शोधायचा – मार्ग २
हरवलेला फोन शोधण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा देखील वापर करू शकता,या पद्धती मध्ये देखील तुमचा फोन कुठे आहे हे कळेल पण त्या साठी तुमच्या मोबाईल चे इंटरनेट चालू हवे व तुमचा फोन स्विच ऑफ केलेला अथवा रिसेट केलेला नसावा. “अण्ड्रोइड डिवाइस मॅनेजर”(Android Device Manager) हे अॅप तुमच्या मोबाईल मध्ये इन्बिल्ट असेल,पूर्वी हे अॅप्लिकेशन गूगल प्ले स्टोर वरुण डाऊनलोड करावे लागत असे पण हल्ली हे प्रत्येक मोबाईल मध्ये असतेच. तर मित्रांनो तुम्हाला हे अॅप चालू स्थितीत ठेवावे लागेल त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल च्या सेटिंग मध्ये जाऊन तशी सेटिंग करून ठेवलेली असावी.
अण्ड्रोइड डिवाइस मॅनेजर – मोबाईल हरवला शोधायला उपयोगी
ज्या वेळी तुमचा मोबाईल / फोन चोरीला जातो त्या वेळी तुम्हाला गूगल अकाऊंट चा वापर करून अण्ड्रोइड डिवाइस मॅनेजर (Android Device Manager) मध्ये लॉगिन करा. हे करण्यासाठी मित्राचा अथवा घरचा दूसरा फोन देखील तुम्ही वापरू शकता, त्या फोन मध्ये गेस्ट मोड करून तुम्ही हे लॉगिन करा,लॉगिन केल्या वर तुम्हाला तुमचा मोबाईल कुठे आहे हे मॅप वर दिसेल.आणि तिथूनच तुम्ही तुमच्या मोबाईलचा सर्व डाटा डिलीट करू शकता किंवा फोन वर रिंग सुद्धा देऊ शकता जेणेकरून तुम्हाला मोबाईल जवळ पास कुठे असेल तर लगेच सापडेल. हे सर्व करण्यासाठी शक्यतो कम्प्युटर किंवा लॅपटॉप न वापरता दुसर्या मोबाईल वरून च करा कारण तुम्ही तो मोबाईल घेऊन त्या लोकेशन पर्यन्त जाऊ शकता आणि तुम्हाला एकदा का तुमच्या हरवलेल्या / चोरीला गेलेल्या मोबाईलचे लोकेशन सापडले की लगेच त्या ठिकाणी जाऊन तुमच्या फोन वर रिंग देखील करू शकता. अशा रीतीने अगदी सहजपणे तुम्ही तुमचा हरवलेला फोन शोधू शकता.
परंतु हे सगळे करण्यापूर्वी तुमच्या हरवलेल्या फोन चे इंटरनेट चालू असले पाहिजे. मित्रांनो त्यामुळे नेहमी आपल्या फोन ला लोक ठेवा जेणेकरून तुमचा हरवलेला फोन कोणी लागलीच चालू करू शकणार नाही किंवा रिसेट करू शकणार नाही. आणि जरी कोणी तसे केलेच तर तो लॉक उगढे पर्यन्त तुम्ही तुमचा मोबाईल कुठे आहे हे शोधलेले असेल.
हरवलेला मोबाईल शोधणे – मार्ग ३:
वरील दिलेल्या हरवलेला फोन शोधण्याच्या दोन्ही पद्धतींचा वापर करण्यास तुम्ही असमर्थ असाल तर तुम्ही हा मार्ग वापरुन तुमचा हरवलेला फोन शोधू शकता. या मार्गाचा अवलंब करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा आयएमईआय (IMEI) नंबर माहिती असणे गरजेचे आहेआता तुम्ही म्हणाल हा IMEI नंबर कुठे सापडेल,आमचा मोबाईल तर चोरीला गेला आहे. तर मित्रांनो घाबरू नका तुमचा मोबाईल जरी हरवला असला तरी तुमच्या कडे तुमच्या मोबाईल चा बॉक्स असेल तर त्यावर तुम्हाला हा IMEI नंबर मिळेल. IMEI नंबर म्हणजे International Mobile Equipment Identity, आणि हा नंबर प्रत्येक मोबाईल चा वेगवेगळा असतो. आता तुम्हाला तुम्ही वापरत असलेल्या मोबाईलचा IMEI नंबर पाहावयाचा असेल तर तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये तुम्हाला तो मिळेल किंवा हातातील मोबाईल वर *#06# डायल करा तुम्हाला IMEI नंबर दिसेल.
आयएमईआय नंबर द्वारे हरवलेला फोन शोधणे:
तर मित्रांनो तुमच्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI नंबर तुम्ही पोलिस स्टेशन ला मोबाईल हरवला म्हणून कम्प्लेंट कराल तेंव्हा द्या. पोलिस तुमच्या IMEI नंबर वरून शोधू शकतात की तुमचा मोबाईल आता कुठे आहे ते. अशा रीतीने पोलिसांना तुमचा हरवलेला फोन लवकर सापडेल. अनेक गुन्हेगार / चोरांना शोधण्यासाठी पोलिस या ट्रॅकिंग तंत्राद्यानाचा वापर करत असतात. याव्यतिरिक्त गूगल च्या प्ले स्टोर वर IMEI नंबर वरुण हरवलेला मोबाईल ट्रक करणारे अनेक अॅप्लिकेशन आहेत
त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता.
चोरीला गेलेला मोबाईल शोधणे – मार्ग ४:
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने CEIR (Central Equipment Identity Register) ची घोषणा केली आहे. याचा उपयोग करून आपण आपला हरवलेला फोन / मोबाईल अगदी सहज पणे परत मिळवू शकता. CEIR या वेबसाइट च्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल शोधू शकता.सर्वप्रथम आपण मोबाईल हरवल्या बाबत जवळच्या पोलिस स्टेशन ला तक्रार नोंदवावी. त्याचबरोबर तुमच्या मोबाईल ऑपरेटर ला मोबाईल हरवल्या बाबत माहिती देऊन जुने सिमकार्ड बंद करून नवीन सिमकार्ड ची मागणी करा.
CEIR च्या मदतीने हरवलेला फोन शोधा:
मग CEIR च्या वेबसाइट वर या,इथे तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईल चा IMEI नंबर टाकून तू ब्लॉक करायचा आहे, त्यानंतर इतर माहिती भरा जसे की,मोबाईल नंबर,मोबाईल ची कंपनी, तुमचे नाव,पत्ता,मोबाईल हरवलेले ठिकाण,तारीख,तुमचे ओळख पत्र,मोबाईल खरेदीची पावती व पोलिस तक्रारीची प्रत इत्यादि अपलोड करा.हे सर्व केयानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल वर OTP येईल तो टाका. या प्रकारे सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला रिक्वेस्ट आईडी मिळेल त्याच्या सहाय्याने तुम्ही मोबाईल च्या शोधाची प्रक्रिया कुठ पर्यन्त आली आहे हे तुम्हाला पाहता येईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन CEIR च्या मदतीने शोधू शकता.
हरवलेला फोन सापडल्यावर करवयाची प्रक्रिया:
तुम्हाला तुमचा हरवलेला फोन सापडल्या नंतर, जर तुम्ही तू शोधण्या साठी IMEI नंबर ब्लॉक केला असेल तर सर्व प्रथम CEIR या वेबसाइटच्या “अनब्लॉक फाऊंड मोबाईल” या पर्यायाच्या मदतीने तुमच्या मोबाईलचा IMEI नंबर जो तुम्ही ब्लॉक केला होता तो अनब्लॉक करून घ्यावा लागेल. तर मित्रांनो अशा रीतीने हरवलेला फोन सापडल्यावर हुरळून न जाता सर्व प्रथम आपण IMEI अनब्लॉक करून घ्यावा.
हरवलेला मोबाईल कसा शोधायचा ?
हरवलेला मोबाईल शोधण्याचे ४ विविध मार्ग आहेत जे तुम्हाला आमच्या या लेखात दिलेले आहेत.
मार्ग १ – गूगल चे गूगल मॅप हे अॅप्लिकेशन वापरुन मोबाईल शोधणे.
मार्ग २ – “अण्ड्रोइड डिवाइस मॅनेजर”(Android Device Manager) हे अॅप वापरुन देखील तुम्ही हरवलेला मोबाईल शोधू शकता.
मार्ग ३ – मोबाईलचा आयएमईआय (IMEI) नंबर पोलिसांना ट्रक करायला लाऊन देखील तुम्ही मोबाईल शोधू शकता.
मार्ग ४ – केंद्र सरकारने सुरू केलेल्या CEIR (Central Equipment Identity Register) या वेबसाइट च्या मदतीने देखील तुम्ही हरवलेला मोबाईल शोधू शकता.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to search lost mobile in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC