23 February 2025 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

योगी सरकारची वारंवार पोलखोल | माजी IAS अधिकाऱ्याच्या ट्विटर अकाउंट कारवाईसाठी केंद्राचा पुढाकार

retired IAS office Surya Pratap Singh

नवी दिल्ली, ०५ जून | उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर हँडलवर ट्विटरचा सावळा गोंधळ उघड झाला. नायडूंचं जे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट आहे, त्याची ब्लू टिक हटवत आधी अनव्हेरिफाईड केलं गेलं आणि नंतर काही तासात ते पुन्हा व्हेरिफाईड केलं गेलं. पण उपराष्ट्रपतीपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीबद्दल ट्विटरची ही कारवाई झाल्याने भाजपने थयथयाट केला आहे.

ट्विटरनं उपराष्ट्रपतींच्या हँडलची ब्लू टिक कशी काढली? हा भारतीय घटनेवरील हल्ला आहे, अशी संतप्त भावना भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश नाखुवा यांनी व्यक्त केली. परंतु, काही ट्विटर वापरकर्त्यांच्या मते, नायडूंचं ट्विटर खातं सक्रिय नसल्यानं ते अनव्हेरिफाईड करण्यात आलं असावं असं म्हटलं गेलं आणि तेच सत्य समोर आलं.

ट्विटरच्या अटींनुसार, एखादी व्यक्ती त्याच्या हँडलचं नाव (@handle) बदलते किंवा एखादं अकाऊंट बऱ्याच दिवसांपासून निष्क्रिय असतं किंवा ट्विटरनं ज्या कारणासाठी अकाऊंट व्हेरिफाय ते कारणच आता अस्तित्वात नसल्यास ब्लू टिक हटवली जाते. व्यंकय्या नायडूंकडून उपराष्ट्रपतींचं ट्विटर हँडल वापरलं जातं. त्यावरील ब्लू टिक कायम आहे.

दरम्यान, या घटनेवरून देशाच्या घटनेवर हल्ला असल्याचा कांगावा करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. ट्विटर पुराव्यानिशी आणि नियमांचे पालन करून भाजपाची पोलखोल करणाऱ्या अकाउंट्स विरोधात मोदी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन लॉ इन्फोर्समेंटने ट्विटरसोबत लेखी संवाद करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंग हे उत्तर प्रदेश सरकारची नेहमीच पोलखोल करण्यात सक्रिय असताना. त्यांच्या ट्विटला पत्रकारांपासून सर्वच मोठा प्रतिसाद देतात. त्यामुळे संतापलेल्या योगी सरकारने त्यांच्याविरोधात FIR देखील दाखल केले होते. आता केंद्र सरकार देखील कार्यरत झालं असल्याचं पाहायला मिळतंय. कारण केंद्रीय इंडियन लॉ इन्फोर्समेंटने ट्विटरशी संपर्क करत माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंग यांच्या अकाउंटवर कारवाईसाठी ट्विटरला कळवलं आहे. स्वतः सूर्यप्रताप सिंग यांनी याची माहिती दिली आहे.

 

News English Summary: Former IAS officer Surya Pratap Singh has always been active in policing the Uttar Pradesh government. His tweet received a huge response from journalists. The enraged Yogi government had also filed an FIR against him. Now we can see that the central government is also working. This is because the Central Indian Law Enforcement has contacted Twitter and informed Twitter to take action on the account of former IAS officer Surya Pratap Singh.

News English Title: Indian Law Enforcement communicate with Twitter to take action against retired IAS office Surya Pratap Singh news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x