11 January 2025 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

Infinix Hot 12 Play | 7GB रॅमचा स्मार्टफोन फक्त 8499 रुपयांमध्ये खरेदी करा | जबरदस्त ऑफर

Infinix Hot 12 Play

Infinix Hot 12 Play | नुकताच लाँच झालेला बजेट स्मार्टफोन इन्फिनिक्स हॉट 12 प्ले सोमवारी (30 मे 2022) विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 8,499 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नाचो, सिंग, सेलिब्रेट हॅपीनेस – इन्फिनिक्स हॉट 12 प्ले उद्या विक्रीसाठी उपलब्ध असेल! सेगमेंट फर्स्ट फिचर्स असलेला हा स्मार्टफोन तुम्हाला ८,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

फ्लिपकार्टवर विक्री :
फोनची विक्री फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा सेगमेंटमधील सर्वात वेगवान स्मार्टफोन आहे. यात 6.82 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळतो, जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. याशिवाय बॅटरीही बरीच मोठी आहे. फोन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी या स्मार्टफोनची डिस्प्लेपासून कॅमेरा आणि बॅटरीपर्यंतची सर्व माहिती जाणून घ्या.

इनफिनिक्स हॉट 12 प्लेची संपूर्ण माहिती :

किंमत आणि रंग :
फोन एकाच व्हेरियंटमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजमध्ये येतो. याची किंमत ८,४९९ रुपये आहे. हे डेलाइट ग्रीन, होरायझन ब्लू आणि रेसिंग ब्लॅक या तीन कलर ऑप्शनमध्ये येते.

डिस्प्ले :
इनफिनिक्स हॉट १२ प्लेमध्ये ६.८२ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट, १८० हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि ४८० निट्स ब्राइटनेस देण्यात आला आहे.

प्रोसेसर :
हा स्मार्टफोन युनिसोक टी ६१० प्रोसेसरवर काम करतो आणि यात ३ जीबी (व्हर्च्युअल रॅम) देखील आहे. यामुळे एकूण रॅम ७ जीबीपर्यंत वाढते.

बॅटरी :
इनफिनिक्स हॉट 12 प्लेमध्ये टाइप-सी चार्जिंग स्लॉटसह 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

कॅमेरा:
फोन १३ मेगापिक्सलचा ड्युअल एआय बॅक कॅमेरा सपोर्ट करतो. तसेच ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Infinix Hot 12 Play sale on Flipkart online check details 29 May 2022.

हॅशटॅग्स

#Flipkart(15)#Infinix Hot 12 Play(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x