6 February 2025 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

इस्रोकडून GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इंटरनेट स्पीड वाढणार

ISRO, G-SAT Satellite, French Guyana, NASA

नवी दिल्ली: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आज पहाटे २ वाजून ३५ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण करण्यात आले. GSAT-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार आहे. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे इंटरनेट आधिक गतीने चालणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.

GSAT-30चं वजन सुमारे ३१०० किलो असून लॉन्चिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असून त्यामुळे ऊर्जा मिळणार आहे. यापूर्वी इनसॅट-४ए हा उपग्रह २००५मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे आता हा नवा उपग्रह लॉन्च करण्यात आला असून त्यामुळे भारतातील दूरसंचार सेवेत सुधारणा होणार आहेत. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. विशेष म्हणजे मोबाइल सेवा ज्या क्षेत्रात अद्याप पोहचू शकलेल्या नाहीत, त्या क्षेत्रात या नव्या उपग्रहामुळे मोबाइल सेवा पोहचू शकणार आहेत.

व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेलिव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार असून, हवामान बदल आणि हवामानाचा अंदाज समजण्यासाठी हा उपग्रह मदतगार ठरणार आहे. यंदाच्या वर्षी भारतातल्या इस्रोकडून एकूण १० उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. यात आदित्य-एल १ उपग्रहाचाही समावेश आहे. या उपग्रहाला २०२० पर्यंत प्रक्षेपित केलं जाईल. मिशन सूर्याचा अभ्यास करणारा हा पहिला भारतीय उपग्रह ठरणार आहे.

 

Web Title:  ISRO successfully launched Indias first satellite of 2020 GSAT 30.

हॅशटॅग्स

#PSLV(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x