7 January 2025 8:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

मोदींच्या डिजिटल इंडियात मोबाईल डेटा वेग मंदच | नेपाळ, पाकिस्तान सुद्धा पुढे

Low Mobile Data Speed, India

मुंबई, २६ ऑक्टोबर : मोबईलवर इंटरनेटचा वापर ही काही आता चैनीची गोष्ट राहिली नसून ती एक जीवनावश्‍यक गोष्ट झाली आहे. संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त दरात मोबाईल डेटा मिळतो. परंतु या मोबाईल डेटाच्या स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे असल्याचे दिसून आले आहे. मोबाईल डेटा स्पीडमध्ये भारत जगात 131 व्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान हे देश भारताच्या पुढे आहेत.

डेटा स्पीड ट्रॅक करणारी कंपनी उक्‍लोच्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्‍स सप्टेंबर 2020 च्या अहवालानुसार भारतात सरासरी मोबाइल डाऊनलोड स्पीड हा 12.07 एमबीपीएस इतका आहे आणि अपलोड स्पीड 4.32 एमबीपीएस आहे. तर लेटेन्सी रेट एमएस इतका आहे. जगभरातील सरासरी मोबाईल डेटा स्पीड हा 35.26 एमबीपीएस (डाऊनलोड स्पीड) इतका आहे, अपलोड स्पीड 11.22 एमबीपीएस आणि लेटेन्सी रेट 34 एमएस इतका आहे.

दक्षिण कोरिया नंबर एकवर मोबाइल डेटा स्पीडच्या बाबतीत दक्षिण कोरिया हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियामध्ये डाऊनलोड स्पीड 121 एमबीपीएस, सरासरी अपलोड स्पीड 18.81 एमबीपीएस आणि लेटेन्सी रेट 34 एमएस इतका आहे. फिक्‍सड लाइन ब्रॉडबॅंडच्या बाबतीत दक्षिण कोरिया 14 व्या स्थानी आहे. यात द. कोरियात 155.39 एमबीपीएस डाऊनलोड स्पीड आणि 147.89 एमबीपीएस इतका सरासरी अपलोड स्पीड मिळतो. तर तिथला लेटेन्सी रेट 22 एमएस इतका आहे.

फिक्‍स्ड लाइन ब्रॉडबॅंडच्या बाबतीत भारताची स्थिती थोडी बरी आहे. या लिस्टमध्ये भारत 70 व्या क्रमांकावर आहे. यामध्ये भारतात सरासरी 46.47 एमबीपीएस डाऊनलोड स्पीड, 42.43 एमबीपीएस अपलोड स्पीड मिळतो, तर लेटेन्सी रेट एमएस इतका आहे. परंतु या लिस्टमध्येदेखील घाना, मोलडोव्हा आणि मालटासारखे देश भारताच्या पुढे आहेत.

 

News English Summary: Mobile users in India have mostly forgotten to keep a check as to how much data they are spending, thanks to cheap unlimited data plans. In fact, India has the cheapest mobile internet plans in the world. Getting 2GB of 4G data per day by spending less than $5 a month is standard in the country. You can even get 3GB data per day if you decide to spend just $1 more monthly. Super affordable mobile internet is one of the key highlights in the digital journey of India. While you may struggle to finish 2GB or 3GB mobile internet data on a daily basis there is no denying that you still need to connect to a reliable Wi-Fi connection while playing games or watching high-resolution videos. This is because there may be ample mobile data but the speed is limited.

News English Title: Low Mobile Data Speed in India News Updates.

हॅशटॅग्स

Mobile(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x