24 December 2024 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Group IPO | सज्ज व्हा, पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुप कंपनीचा मेगा IPO लाँच होतोय, नव्या वर्षात पैसा वाढवा - प्राथमिक खुला देकार BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN
x

आम्ही पुन्हा येणार | Paytm मध्ये तुमचा पैसा सुरक्षित | Paytm ची माहिती

Money in paytm App, Google Playstore, Google Pay, Marathi News ABP Maza

मुंबई, १८ सप्टेंबर : सर्वात लोकप्रिय पेमेंट ऍप असलेलं Paytm रहस्यमयरीत्या गुगल प्ले स्टोअरवरून गायब झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवर सर्च केल्यानंतर पेटीएम ऍप सापडत नाहीये. One97 Communications Limited कंपनीच्या मालकीची इतर ऍप गुगल प्ले स्टोअरवर सापडत आहेत. पेटीएम बिझनेस, पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीचे इतर ऍप्स अद्याप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे Paytm ऍपल स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

गुगलने यासंदर्भात आपल्या ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे. लाखो युझर्स असणाऱ्या पेटीएमवर कारवाई करण्यामागे कंपनीने ऑनलाइन जुगारासंदर्भातील नियमांचे कारण दिलं आहे. “आम्ही ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अ‍ॅपला परवानगी देत नाही. एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अ‍ॅपचाही यामध्ये समावेश होतो. अशाप्रकारच्या देवाणघेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे,” असं गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

यावर पेटीएम कंपनीने खुलासा केला असून आम्ही पुन्हा येणार असल्याचे म्हटले आहे. काही काळासाठी Paytm Android app हे Google’s Play Store वरून डाऊनलोड किंवा अपडेट करता येणार नाही. ते लवकरच पुन्हा उपलब्ध होईल, असे म्हटले आहे. तसेच तुमचे पेटीएमवर असलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही नेहमीप्रमाणे व्यवहार करू शकता, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

 

News English Summary: Paytm Android app is temporarily unavailable on Google’s Play Store for new downloads or updates. It will be back very soon. All your money is completely safe, and you can continue to enjoy your Paytm app as normal.

News English Title: Money is completely safe  and users can continue to enjoy your Paytm app as normal Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Google(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x