23 November 2024 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

ऑनलाईन परीक्षा | इंटरनेट नेटवर्कसाठी गोंदियातील विद्यार्थ्यांची छत्तीसगढ सीमेपर्यंत धाव

No internet signal, Students Gondwana University, Gadchiroli district

गोंदिया, १० मार्च: देशातील ग्रामीण भागाच्या अनेक पट्ट्यांमध्ये इंटरनेटचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात अनेक ठिकाणी दयनीय अवस्था असल्याचं पाहायला मिळतंय. कारण त्याचा थेट परिणाम शिक्षणावर होताना दिसत असला तरी सरकारी यंत्रणांना त्याचं गांभीर्य नाही असंच म्हणावं लागेल.

इंटरनेटचं कमी सिग्नल आणि अचानक आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे गोंडवाना विद्यापीठाची मोबाइलवर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांची चांगली दमछाक झाली. काहींनी गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन तर काहींनी नेटवर्कच्या शोधात थेट छत्तीसगढ सीमेपर्यंत धाव घेत पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांना तर नेटवर्क उपलब्ध न झाल्याने पेपर सोडवण्यापासून वंचित राहावे लागले. तर काहींनी जंगलात बसून पेपर सोडवला. (No internet signal available for students of Gondwana University in Gadchiroli district)

गोंडवाना विद्यापीठाच्या बी.एस्सी आणि बी.ए. या पदवी अभ्यासक्रमाची सध्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. पण कोरचीत दोन दिवसांपासून मोबाइल नेटवर्कच नव्हते. त्यामुळे सोमवारी पेपर सोडविण्यासाठी नेटवर्क मिळवताना विद्यार्थ्यांना रानावनात भटकंती करावी लागली.

तसेच कोरची तालुका निर्मितीपासून या तालुक्यात फक्त BSNL’चे नेटवर्क आहे. अनेकवेळा ते देखील उपलब्ध नसतं असा अनुभव आहे. त्यात येथील दूरसंचार विभागात एकही जबाबदार अधिकारी नाही जो या विषयाला अनुसरून काही पाऊल उचलेल. एका व्यक्तीच्या भरवशावर मागील काही वर्षांपासून सेवा दिली जात आहे. कोरची तालुक्यातील नेटवर्कची जोडणी भंडारा जिल्ह्यातून आहे. तिकडे रस्त्याच्या कामामुळे बिघाड निर्माण होऊन दोन दिवस नेटवर्क प्रॉब्लेम निर्माण झाला होता, तो आता दुरुस्त झाला आहे, असे बीएसएनएलचे सहायक महाव्यवस्थापक जे. एफ. खुराणा यांनी सांगितले.

 

News English Summary: Due to low internet signal and sudden technical glitch, some students of Gondwana University in Gadchiroli district, who were taking online exams on their mobiles, were in a bad mood. Some went to the Gondia district border while others ran directly to the Chhattisgarh border in search of a network to solve the paper. Some students were deprived of solving papers due to non-availability of network. Some of them sat in the forest and solved the paper.

News English Title: No internet signal available for students of Gondwana University in Gadchiroli district news updates.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x