16 November 2024 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN Penny Stocks | 67 पैशाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, चिल्लर गुंतवणूक नशीब बदलू शकते - Penny Stocks 2024 Mutual Fund SIP | केवळ 10 हजाराची SIP बचत देईल 3.5 करोड रुपये परतावा, असा पैशाने पैसा वाढवा - Marathi News Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका
x

Ookla Speed Test | भारतात 5G लाँच, तर इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताची क्रमवारी 78 वरून 79 व्या स्थानावर घसरली

Ookla Speed Test

Ookla Speed Test | इंटरनेट स्पीड टेस्टच्या बाबतीत भारताच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली. सप्टेंबर महिन्यात मोबाइल आणि ब्रॉडबँड या दोन्ही वेगांच्या बाबतीत भारत मागे पडल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीत ग्लोबल इंटरनेट स्पीडटेस्ट इंडेक्स ओकलाने दाखवून दिले आहे. या अहवालानुसार ब्रॉडबँड आणि मोबाइल इंटरनेट स्पीड या दोन्ही बाबतीत भारताचा क्रमांक घसरला आहे. इंटरनेट स्पीडच्या बाबतीत देशात ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये आणखी घट झाली आहे.

जगात ब्रॉडबँडच्या वेगात घसरण :
ब्रॉडबँडच्या वेगाच्या बाबतीत भारताची जगात ११७ स्थानांवरून ११८वर घसरण झाली आहे, तर मोबाइल इंटरनेट स्पीड रँकिंगच्या बाबतीत देश ७८व्या स्थानावरून ७९व्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये भारताचा सरासरी मोबाइल डाऊनलोड स्पीड आधीच सुधारला आहे, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. मोबाइल डौलनोडचा वेग सप्टेंबरमध्ये 13.87 एमबीपीएस इतका नोंदविण्यात आला होता, जो ऑगस्टमध्ये 13.52 एमबीपीएस होता.

इंटरनेटचा वेग वाढून ४८.५९ एमबीपीएस झाला :
सप्टेंबरमध्ये ब्रॉडबँड इंटरनेटचा वेग वाढून ४८.५९ एमबीपीएस झाला आहे, जो ऑगस्टमध्ये ४८.२९ एमबीपीएस होता. रिपोर्टनुसार, मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे, तर ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत चिली जगात आघाडीवर आहे.

ऑक्टोबर महिन्यातच 5G नेटवर्क सुरू :
ऑक्टोबर महिन्यातच ५ जी नेटवर्क सुरू करण्यात आले आहे. देशातील प्रमुख 8 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे, परंतु या शहरांमधील सर्व वापरकर्त्यांना 5 जी कनेक्टिव्हिटी मिळत नाही. ही सेवा सुरू झाल्यानंतर देशात मोबाइल इंटरनेटचा वेग सुधारेल, अशी अपेक्षा होती. पण या क्षेत्रात भारताला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ओकला दर महिन्याला ग्लोबल इंटरनेट स्पीड डेटा जारी करते. लाखो लोकांनी केलेल्या स्पीड टेस्टच्या आधारे हा अहवाल तयार केला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ookla Speed Test Indias Ranking fallen from 117 To 118 in Global Median Mobile Speed check details 20 October 2022.

हॅशटॅग्स

#Ookla Speed Test(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x