महत्वाच्या बातम्या
-
PSLV ची हाफ सेंच्युरी, RISAT-2BR1 अवकाशात प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज आणखी एक मोठी यशस्वी कामगिरी केलीय. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून आज रिसॅट-२ बीआर १ (RISAT-2BR1) या उग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. PSLV-C48 या प्रक्षेपक वाहनाद्वारे हे यान अवकाशात यशस्वीपणे झेपावलं. यातली खास बाब ही होती की PSLV या प्रक्षेपक वाहकाचं हे ५०वं उड्डाण होतं. PSLV हे भारताचं विश्वसनीय प्रक्षेपक वाहन आहे. याच वाहनाने याआधी अनेक उपग्रह अवकाशात झेपावले होते. अवकाशातून पृथ्विवरचे फोटो घेण्याचं अचूक तंत्रज्ञान या उपग्रहामध्ये आहे. अतिशय स्पष्ट आणि उत्तम दर्जाचे फोटो या उपग्रहामधून घेतात येतात. त्यामुळे हेरगिरीसाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
'इस्रो'ची अवकाशात भरारी, 'कार्टोसॅट-३' अवकाशात झेपावलं
भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातून नवनवे विक्रम प्रस्तापित केले जात आहेत आणि त्यात अनेक विक्रमांची भर पडत आहे. इस्त्रोने (ISRO) इतिहास रचला असून १६२५ किलो वजनाच्या ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. पीएसएलव्ही सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं. ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहासह अमेरिकेतील १३ व्यावसायिक लघु उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा (Shriharikota Satish Dhawan Center) येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आलं. पृथ्वीची छायाचित्रं काढण्यासाठी, तसंच नकाश निर्मितीसाठी ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
ट्विटरवर राजकीय जाहिरातींना बंदी
अत्यंत कमी वेळात तरूणांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं प्रमुख साधन असलेल्या सोशल मीडियावरील ट्विटरनं आता राजकीय जाहिरातींना बंदी घातली आहे. त्यामुळं ट्विटरवर आता राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. जगभरात ही बंदी घालण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
फेसबुकवर न्यूजसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार
फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात घडणाऱ्या घडामोडींची बरीचशी माहिती युजर्स फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या बातम्यांमधूनच मिळते. दरम्यान, देशभरातील विविध प्रसार माध्यमं फेसबुकचा वापर करून स्वतःच्या पोर्टलवरील बातम्या जास्तीत जास्त ग्राहकांकडे पोहोचवतात. मात्र देशभरात इतके स्थानिक आणि इंग्रजी भाषेतील न्युज चॅनेल्स आणि पोर्टल्स आहेत की युजर्स प्रत्येक पोर्टल किंवा चॅनेलला फॉलो करतंच असेल असं नाही.
5 वर्षांपूर्वी -
चांद्रयान-२: ९८ टक्के यश मिळाल्याचा दावा हास्यास्पद: इस्रोचे वैज्ञानिक सल्लागार तपन मिश्रा
मागील काही दिवसांपासून मिशन चांद्रयान-२ विषय तापता ठेवण्यात आला आहे. मात्र के.सिवान यांचे दावे एकूण इस्रोचे वैज्ञानिक देखील संतापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकारण्यांनी वैज्ञानिकांच्या आडून स्वतःचा प्रचार करून घेतल्याचं यापूर्वीच अनेकांनी म्हटलं आहे. भाजपने देखील या मिशनवरून स्वतःचा प्रचार करून घेतले. त्यात मागील अनेक दिवसांपासून दावे प्रति दावे करण्यात येत होते. मात्र काही दिवसांपूर्वी इस्रोच्या अध्यक्षांकडून गौतम अदानी यांच्या खाजगी कंपनीला तब्बल २७ सॅटेलाईट बनविण्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि हे मिशन फेल होऊन देखील का पेटत ठेवण्यात आलं याचा अंदाज सर्वांना आला. मात्र आता इस्रोतील वैज्ञानिकांचे अप्रत्यक्ष आरोप समोर येऊ लागल्याने वेगळीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
संतापजनक! ज्या इस्रो शास्त्रज्ञांचं कौतुक मोदींनी केलं त्यांच्या पगारवाढीत कपात
सध्या देशभर चांद्रयान-२ मोहिमेवरून भारतीय शास्त्रज्ञावर कौतुकाचा आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं देशात आणि जगभरातून कौतुक होत असलं तरी मोदी सरकारच्या निर्णयानंतर मात्र सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे. चांगल्या कामाची पोचपावती केवळ शब्दात देऊन सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेतली, मात्र दुसरीकडून एक धक्कादायक निर्णय घेतल्याने त्याचा थेट आर्थिक फटका भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना बसणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
हार्ड लँडिंग'नंतर देखील चंद्रावर 'विक्रम' सुरक्षित
मोहिमेत अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे लँडरचे नेमके काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता इस्रोकडून लँडरबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. विक्रमने चंद्रावर हार्ड लँडिंग केले असले तरी विक्रम लँडरचे काहीही नुकसान झालले नाही. ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार कळतं की विक्रम नियोजित स्थळाजवळ उभं आहे. ते तुटलेलं नाही.’
5 वर्षांपूर्वी -
चांद्रयान-२ मोहीम: इस्रो शास्त्रज्ञांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा; पुन्हा जोरदार प्रयत्न करावे
चंद्रापासून अवघे २.१ किमीच्या अंतरावर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि भारताच्या चांद्रयान- २ मोहिमेला धक्का बसला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षणाचे साक्षीदार होत सर्व शास्त्रज्ञांना धीर दिला. यानंतर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करत आहेत होते.
5 वर्षांपूर्वी -
चांद्रयान २: इतिहास घडणार! आज मध्यरात्री चंद्रावर फडकणार तिरंगा
चंद्रस्पर्शासाठी चांद्रयानाप्रमाणेच सारे देशवासियही आतुर झाले आहेत. चांद्रयान-२ चे लँडर असलेले ‘विक्रम’ चांद्रभूमीवर उतरण्यासाठी उद्या, शनिवारपासून पूर्वप्रयत्न सुरू करणार आहे. चंद्रावर सुरक्षितरीत्या उतरण्यासाठी या मोहिमेतील हा सर्वात अखेरचा टप्पा असणार आहे. याची सुरुवात शनिवारी पहाटे होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सिवन यांचा गौरव केला आहे. चांद्रयान-2 या मोहिमेचं सिवन नेतृत्व करत आहेत. इस्रोचं अध्यक्षपद सांभाळणाऱ्या सिवन यांची कहाणी ही संघर्षमय आहे.
5 वर्षांपूर्वी -
गूगल मॅप लॉंच करणार नवीन फिचर 'थ्रीडी मॅप'
कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर रस्ता माहित नसून सुद्धा आपण एका गोष्टीच्या भरवश्यावर बाहेर निघतो ते म्हणजे गूगल मॅप. या अँपमुळे गाडी थांबवून मग लोकांना विचारण्यापेक्षा या अँपने सांगितलेल्या दिशेने जाणे फारच सोईचे पडते. या अँपचा वापर वाढल्याने गुगल मॅप वापरकर्त्यांसाठी ऑगमेन्टेड रिएलिटी वॉकिंग डायरेक्शन हे नवीन फिचर लॉँच करणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
जिओ फायबर लाँच; आता घर बसल्या पाहा फर्स्ट डे फर्स्ट शो: रिलायन्सची घोषणा
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत सोमवारी ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात बहुप्रतिक्षित जिओ फायबर, जिओ फोन ३, जिओ सेटऑफ बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत इतर सेवांची घोषणा केली. पाच सप्टेंबर जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार आहे. याचे ७०० रुपयांपासून प्लॅन सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
इस्रोला चंद्रयान-२ परिपूर्ण करण्यासाठी वैदिक गणिताने केली मदत.
भारताचे दुसरे चंद्र मिशन म्हणजेच चंद्रयान-२ अब्ज स्वप्नांना अंतराळात घेऊन पोचले खरे पण या मागे शास्त्रज्ञांसोबतच कित्येक गोष्टींचा हातभार लागला होता. भारत आता चंद्रावर उतरलेला चौथा देश आहे. आणि दक्षिण ध्रुवाकडे पोचलेला पहिला देश आहे. नुकतीच पृथ्वीची काही छायाचित्रे चंद्रयान-२ कडून भारतात पाठवण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
इस्रोने शेअर केली चंद्रयान-२ द्वारे काढलेली पृथ्वीची पहिली छायाचित्रे
२२ जुलै २०१९ रोजी चंद्रयान-२ आपल्या मोहिमेवर रवाना झाल्यानंतर काही दिवसातच सोशल मीडियावर काही खोटी छायाचित्रे वायरल होणे सुरु झाले होते. हि छायाचित्रे चंद्रयान-२ द्वारे काढण्यात आल्याचा दावा केला जात होता. पण आता इस्रोनेच चंद्रयान-२ द्वारे काढलेली पृथ्वीची पहिली छयाचित्रे ट्विटरवरून लोकांपर्यंत पोहोचवली आहेत. चंद्रयान-२ च्या विक्रम लँडरच्या एलआय ४ कॅमेराद्वारे हि छायाचित्रे काढण्यात आली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
जगातील पहिले हायपरलुप मॉडेल भारतात आकार घेणार.
आपले महाराट्र राज्य हे जगातील पहिली हायपरलुप सेवा सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणे ते मुंबई दरम्यान पहिल्या हायपरलुप ची उभारणी होणार असून या प्रकल्पाला पूर्ण व्हायला ८ वर्षाचा कालावधी लागणार आहे. यानंतर पुणे ते मुंबई इतके अंतर अवघ्या २३ मिनिटांमध्ये कापता येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
चांद्रयान २: भारतीय शास्त्रज्ञांना श्रेष्ठ म्हणत त्यांचे पगार मोदी सरकारने कापले
दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज(दि.२८) आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशीही दुसऱ्यांदा संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो ISRO) शास्त्रज्ञांचं आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केलं. याशिवाय त्यांनी अन्य अनेक विषयांवरही भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
गॅझेट्स वर्ल्ड: जगातला पहिला फिरता कॅमेरा असणारा फोन
आधुनिक तंत्रज्ञानाचा एक नवा चमत्कार घेऊन स्मार्टफोन इंडस्ट्री मधील टेक्नो-जायंट मानली जाणारी सॅमसंग कंपनी हि आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे जगातील सर्वात पहिला फोन ज्याचा कॅमेरा फिरता आहे. सॅमसंग गॅलॅक्सि A80 असं ह्या स्मरफोनचं नाव असून हा फोन भारतात नुकताच लाँच झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मिशन चांद्रयान २: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; वैज्ञानिकांची 'उत्तुंग' भरारी
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार होते.
5 वर्षांपूर्वी -
आज दुपारी प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण व्हायचे आहे.
5 वर्षांपूर्वी -
तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चं प्रक्षेपण रद्द, लवकरच नवीन वेळ जाहीर करणार
भारताच्या अत्यंत महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण काही तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय इस्रो’ने घेतला आहे. ‘इस्रो’या संदर्भातली अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. पूर्वनियोजित योजनेप्रमाणे आज मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. परंतु ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच अधिकृतपणे जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News