महत्वाच्या बातम्या
-
'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सिवन यांचा गौरव केला आहे. चांद्रयान-2 या मोहिमेचं सिवन नेतृत्व करत आहेत. इस्रोचं अध्यक्षपद सांभाळणाऱ्या सिवन यांची कहाणी ही संघर्षमय आहे.
5 वर्षांपूर्वी -
गूगल मॅप लॉंच करणार नवीन फिचर 'थ्रीडी मॅप'
कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर रस्ता माहित नसून सुद्धा आपण एका गोष्टीच्या भरवश्यावर बाहेर निघतो ते म्हणजे गूगल मॅप. या अँपमुळे गाडी थांबवून मग लोकांना विचारण्यापेक्षा या अँपने सांगितलेल्या दिशेने जाणे फारच सोईचे पडते. या अँपचा वापर वाढल्याने गुगल मॅप वापरकर्त्यांसाठी ऑगमेन्टेड रिएलिटी वॉकिंग डायरेक्शन हे नवीन फिचर लॉँच करणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
जिओ फायबर लाँच; आता घर बसल्या पाहा फर्स्ट डे फर्स्ट शो: रिलायन्सची घोषणा
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत सोमवारी ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात बहुप्रतिक्षित जिओ फायबर, जिओ फोन ३, जिओ सेटऑफ बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत इतर सेवांची घोषणा केली. पाच सप्टेंबर जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार आहे. याचे ७०० रुपयांपासून प्लॅन सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
इस्रोला चंद्रयान-२ परिपूर्ण करण्यासाठी वैदिक गणिताने केली मदत.
भारताचे दुसरे चंद्र मिशन म्हणजेच चंद्रयान-२ अब्ज स्वप्नांना अंतराळात घेऊन पोचले खरे पण या मागे शास्त्रज्ञांसोबतच कित्येक गोष्टींचा हातभार लागला होता. भारत आता चंद्रावर उतरलेला चौथा देश आहे. आणि दक्षिण ध्रुवाकडे पोचलेला पहिला देश आहे. नुकतीच पृथ्वीची काही छायाचित्रे चंद्रयान-२ कडून भारतात पाठवण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
इस्रोने शेअर केली चंद्रयान-२ द्वारे काढलेली पृथ्वीची पहिली छायाचित्रे
२२ जुलै २०१९ रोजी चंद्रयान-२ आपल्या मोहिमेवर रवाना झाल्यानंतर काही दिवसातच सोशल मीडियावर काही खोटी छायाचित्रे वायरल होणे सुरु झाले होते. हि छायाचित्रे चंद्रयान-२ द्वारे काढण्यात आल्याचा दावा केला जात होता. पण आता इस्रोनेच चंद्रयान-२ द्वारे काढलेली पृथ्वीची पहिली छयाचित्रे ट्विटरवरून लोकांपर्यंत पोहोचवली आहेत. चंद्रयान-२ च्या विक्रम लँडरच्या एलआय ४ कॅमेराद्वारे हि छायाचित्रे काढण्यात आली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जगातील पहिले हायपरलुप मॉडेल भारतात आकार घेणार.
आपले महाराट्र राज्य हे जगातील पहिली हायपरलुप सेवा सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणे ते मुंबई दरम्यान पहिल्या हायपरलुप ची उभारणी होणार असून या प्रकल्पाला पूर्ण व्हायला ८ वर्षाचा कालावधी लागणार आहे. यानंतर पुणे ते मुंबई इतके अंतर अवघ्या २३ मिनिटांमध्ये कापता येणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
चांद्रयान २: भारतीय शास्त्रज्ञांना श्रेष्ठ म्हणत त्यांचे पगार मोदी सरकारने कापले
दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज(दि.२८) आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशीही दुसऱ्यांदा संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो ISRO) शास्त्रज्ञांचं आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केलं. याशिवाय त्यांनी अन्य अनेक विषयांवरही भाष्य केलं.
6 वर्षांपूर्वी -
गॅझेट्स वर्ल्ड: जगातला पहिला फिरता कॅमेरा असणारा फोन
आधुनिक तंत्रज्ञानाचा एक नवा चमत्कार घेऊन स्मार्टफोन इंडस्ट्री मधील टेक्नो-जायंट मानली जाणारी सॅमसंग कंपनी हि आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे जगातील सर्वात पहिला फोन ज्याचा कॅमेरा फिरता आहे. सॅमसंग गॅलॅक्सि A80 असं ह्या स्मरफोनचं नाव असून हा फोन भारतात नुकताच लाँच झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मिशन चांद्रयान २: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; वैज्ञानिकांची 'उत्तुंग' भरारी
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार होते.
6 वर्षांपूर्वी -
आज दुपारी प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण व्हायचे आहे.
6 वर्षांपूर्वी -
तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चं प्रक्षेपण रद्द, लवकरच नवीन वेळ जाहीर करणार
भारताच्या अत्यंत महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण काही तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय इस्रो’ने घेतला आहे. ‘इस्रो’या संदर्भातली अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. पूर्वनियोजित योजनेप्रमाणे आज मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. परंतु ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच अधिकृतपणे जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं.
6 वर्षांपूर्वी -
चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार, काउंटडाऊन सुरू
भारताच्या स्पेस मिशनमधील नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. भारताच्या महत्वाकांक्षी मिशन चांद्रयान-२ मोहीमेला अवघे काही तास शिल्लक आहेत. उद्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार आहे. लौंचिंग नंतर ५२ दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. इस्रोच्या या महत्त्वकांशी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेही लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आमच्या लाखो युजर्सना त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत: फेसबुक
समाज माध्यम आज प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले आहेत आणि त्यात फेसबुक, व्हॉट्स अँप आणि इंस्टाग्राम हे सर्वप्रथम डोळ्यासमोर येतंच. परंतु काल म्हणजे बुधवारी दुपारपासून या सर्व सेवांचा वेग अत्यंत मंदावला होता आणि लाखो वापरकर्त्यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला होता. नेटकऱ्यांना फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् अँप वापरताना प्रचंड अडचणी येत होत्या. काल फोटो आणि व्हिडिओ पाठवताचा वेग कमालीचा संथ झाला होता. या सगळ्याबाबत आता फेसबुकने चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या लाखो युजर्सना जो प्रचंड त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत असं फेसबुकने ट्विटकरून म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
अंतराळस्थानक निर्मितीची भारताची योजना : इस्रो
भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-२ चे काऊंडाऊन सुरु झाल्यानंतर अवकाश संशोधनामध्ये भारत आता भविष्यात देखील आणखी महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं वृत्त आहे. त्यासाठी अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
उशीरच झाला! जमिनीवरील नेते शरद पवार आता डिजिटल तंत्राचा वापर करणार
मागील काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही समाज माध्यमांचं महत्त्व वाढलं आहे. याद्वारे नेते थेट आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोडले जातात. याच विषयाला नुसरून एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार ९ जून रोजी सकाळी अकरा वाजता शरद पवारां त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर LIVE असणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शपथविधी दिवशीच दिल्ली भाजपाची वेबसाईट हॅक, बीफ डिशची पोस्ट
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात एकूण २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान एकीकडे राष्ट्रपती भवनात शपथविधीचा शाही कार्यक्रम सुरु असताना दुसऱ्याबाजूला दिल्ली भारतीय जनता पक्षाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. यावेळी हॅकर्सनी वेबसाईटच्या होमपेजवर गोमांस म्हणजेच बीफ रेसिपी पोस्ट केली. या रेसिपीसोबत Hacked by ‘Shadow_V1P3R’ असा मेसेजही लिहिण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
विरोधकांनी EVM'ची 'ती' तांत्रिक बाजू समजून घ्यावी, अन्यथा राजकीय त्सुनामी दर ५ वर्षांनी येईल
काही महिन्यांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशिन्स सुरक्षित नसल्याचा आणि त्यात फेरफार शक्य असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतरच व्हीव्हीपॅट’चा पर्याय पुढे आला होता. मात्र २०१४ पासून ते कालच्या निकालापर्यंत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे मोदी त्सुनामी आणि ईव्हीएम. या बातमीमागील उद्देश हा भारतीय निवडणूक आयोगावर संशय घेणं नसून तर केवळ तंत्रज्ञानाच्या शक्य असणाऱ्या शक्यता मांडणं हा आहे. वास्तविक ईव्हीएमबाबत तांत्रिक (तंत्रज्ञान) चुकीच्या इतक्या बातम्या पेरल्या गेल्या आहेत की प्रत्येकाला त्यात काहीच नवल वाटताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
आज सकाळी पहाटे ५.३० वाजता आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्याच्या उड्डाणाची पंचवीस तासांची उलटगिणती मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सुरू झाली होती. दरम्यान सदर उपग्रह सर्व प्रकारच्या हवामानात रडार इमेजिंगद्वारे निगराणी करणारा आहे. पीएसएलव्ही-सी४६ ची ही ४८वी मोहीम असून, सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा ६१५ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर १५व्या मिनिटाला पृथ्वीच्या कक्षेत सोडला गेला.
6 वर्षांपूर्वी -
दक्षिण कोरिया जगातील पहिली 5G सेवा देणारा देश
तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे असलेल्या अमेरिका, चीन, रशियाला देखील मागे टाकत दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने जगात पहिल्यांदा 5G सेवा देण्याचा पराक्रम केला आहे. काल म्हणजे बुधवारी रात्री अकरा वाजता देशवासियांसाठी 5G सेवा अधिकृतपणे लाँच करण्यात आली. दक्षिण कोरियाने यापूर्वी ५ एप्रिल ही देशात 5जी सेवा सुरु करण्यासाठी तारिख निश्चित केली होती. परंतु, अमेरिकी कंपन्यांना हरवण्यासाठी २ दिवस आधीच ही सेवा सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे 4Gच्या तुलनेत 5G तब्बल २० पटींनी वेगवान असणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
फेसबुकने काँग्रेस संबंधित तब्बल ६८७ पेज, अकाऊंट्स डिलीट केले
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकने कॉंग्रेस पक्षाला जोरदार डिजिटल धक्का दिला आहे. फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेली तब्बल ६८७ पेज आणि अकाऊंट्स डिलीट केली आहेत. त्यांच्या माहितीनुसार आक्षेपार्ह भाषेचा वापर असलेल्या तसेच निलंबित करण्यात आलेली सुमारे ६८७ फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स फेसबूकने हटवली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH