19 April 2025 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट
x

PM-WANI Wi-Fi | ग्रामीण दुर्गम भागापासून मोठ्या शहरातही मिळणार वेगवान इंटरनेट

PM WANI WiFi, Speedy internet service, Rural India, City part

नवी दिल्ली, १० डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी (PM WANI WiFi for speedy internet service) देण्यात आली असून त्यातंर्गत देशात एक कोटी डेटा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या योजनेला ‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेमुळे देशात प्रत्येक ठिकाणी फ्रि वाय-फाय मिळणार असून देशात वायफाय क्रांतीच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कॅबिनेटच्या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि संतोष गंगवार आदी मंत्री उपस्थित होते. त्यांनीच नंतर ही माहिती दिली. देशात एक कोटी डेटा सेंटर उघडण्यात येणार आहेत. या योजनेला प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस योजना असं नाव देण्यात आलं असून त्यामुळे देशात वाय-फाय क्रांतीच होणार असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत देशात पब्लिक डेटा ऑफिस (PDO) उघडण्यात येणार आहेत. त्यासाठी लायसन्सची गरज पडणार नाही. कोणत्याही दुकानाचं डाटा ऑफिसमध्ये रुपांतर करता येऊ शकतं. सरकारकडून डाटा ऑफिस, डाटा अॅग्रिगेटर आणि अॅप सिस्टिम उघडण्यासाठी 7 दिवसात सेंटर उघडण्याची परवानगी दिली जाणार आहे.

दरम्यान लवकरच देशातील कोणत्याही भागात हायस्पीड वायफाय मिळवू शकता. विशेषतः ग्रामीण भागातील दुर्गम भागात आणि जास्त लोकसंख्येच्या शहरातही तुम्हाला वेगवान इंटरनेट मिळवता येईल. विविध ठिकाणच्या हॉटस्पॉटला वायफाय कनेक्ट करणं देखील सहज करण्यात येणार आहे. कारण, यासाठी फक्त एक अॅप असेल आणि एकदा नोंदणी करुन देशात कोणत्याही ठिकाणी वायफाय वापरता येईल.

केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी देशात विविध ठिकाणी करोडो वायफाय हॉटस्पॉट सुरू करण्यासाठी परवानगी दिली. या योजनेनुसार आता चहाच्या टपरीपासून ते नागरी भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी वायफाय मिळेल. १९९० च्या PCO संकल्पनेमुळे लाखो लोकांना सार्वजनिक फोनची सुविधा मिळाली होती. त्याच धरतीवर वायफाय अॅक्सेस नेटवर्क इंटरफेस म्हणजेच WANI ला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली. हे क्रांतीकारी पाऊल ठरण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक हॉयस्पॉट कुणाला सुरू करता येतील?
व्यावसायिक ब्राँडबँड असलेल्या प्रत्येक व्यावसायिकाला हॉटस्पॉट सेटअप करता येईल. याद्वारे अगदी चहाच्या टपरीवर देखील वायफाय उपलब्ध होईल.

वायफाय कसं वापरायचं?
WANI अधिकृत अॅपचा वापर करुन कुणाला देखील सार्वजनिक अॅपचा वापर करता येईल. यासाठी फक्त एकदा नोंदणी करण्याची गरज असेल. यासाठीचं शुल्क विशेष वॉलेटमधून अदा करता येईल.

किती असेल शुल्क?
वायफायसाठीचं शुल्क अगदी किरकोळ असेल. किरकोळ वापरासाठी साधारणतः १० रुपयांपर्यंत शुल्क असेल. यूपीआय पेमेंटप्रमाणे तयार करण्यात आलेल्या वॉलेटमधून हे शुल्क वजा केलं जाईल. एकेकाळी गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांनी देखील भारतात मोफत वायफायची चाचपणी केली होती. कारण, रिलायन्स जिओच्या लाँचिंगनंतर डेटा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता.

वायफाय कनेक्ट कसं कराल?
सार्वजनिक वायफाय वापरण्यासाठी ग्राहकांना फक्त एकदाच नोंदणी करण्याची गरज असेल. अॅपमध्ये एकदा नोंदणी केल्यानंतर देशातील कोणत्याही भागातून वायफायचा वापर करता येईल. व्हिडीओ, सिनेमा किंवा क्रीडा अशा गरजा असलेल्या ग्राहकांसाठी हे एक अत्यंत वेगवान कनेक्शन आहे, जे सुलभ आणि सोयीस्कर आहे.

सार्वजनिक वायफायमागील संकल्पना:
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने काही वर्षांपूर्वी सार्वजनिक वायफायची शिफारस केली होती, जेणेकरुन देशात डिजीटल जोडणीला वाव मिळेल आणि छोट्या दुकानदारांना उत्पन्नाचं साधन देखील तयार होईल. कॅबिनेटने ट्रायने शिफारस केलेल्या WANI ला मंजुरी दिली असून याअंतर्गत देशात लाखो इंटर-ऑपरेटेबल हॉटस्पॉट तयार केले जातील, जे अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध असेल. कनेक्टिव्हीटी सेवांमधील हे यूपीआय असेल, अशी माहिती ट्रायचे माजी चेअरमन आरएस शर्मा यांनी सांगितलं. शर्मा यांच्याच कार्यकाळात हा प्रस्ताव देण्यात आला होता.

कशी असेल प्रणाली?
ट्रायच्या शिफारशीनुसार, केंद्र सरकारने सार्वजनिक डेटा कार्यालय माध्यमकांच्या (PDOAs) निर्मितीसाठी मंजुरी दिली. या माध्यमकांकडून सार्वजनिक डेटा कार्यालये, जसे की किराणा दुकान, वैयक्तिक युझर यांची यादी केली जाईल. दर अत्यंत कमी ठेवण्यासाठी कोणताही परवाना शुल्क न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

 

News English Summary: You can get high speed wifi in any part of the country. You can get high speed internet especially in remote rural areas and in densely populated cities. It will also be easy to connect WiFi to hotspots in different places. Because, there will be only one app for this and you can use WiFi anywhere in the country by registering once. The Modi government at the Center on Wednesday allowed the launch of crores of WiFi hotspots in various parts of the country. Under the scheme, Wi-Fi will now be available everywhere from tea stalls to urban areas. The PCO concept of the 1990s provided millions of people with access to public phones. On the same ground, WiFi access network interface i.e. WANI was approved by the Central Government. This is likely to be a revolutionary step.

News English Title: PM WANI WiFi for speedy internet service in Rural and City part of India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या