डिजिटल नातं | पती व्हॉट्सअॅपवर माझा DP ठेवत नाही | पत्नीची पोलिसात तक्रार
पुणे, ०५ मार्च: तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्याने जग जवळ आल्याचे बोलले जाते. आता या सुविधेने मूळ गरजांमध्ये स्थान मिळविले आहे. स्मार्टफोन व इंटरनेटमुळे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे हाच मोबाइल पती-पत्नीमधील वादाचे कारण ठरत असल्याचे आता समोर आले आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या अनेक दाव्यांमध्ये भांडणाचे मूळ मोबाइलमध्ये असल्याचे दिसून आले आहे. मोबाइलमुळे पती-पत्नीमधील खासगीपणा नष्ट झाला आहे. बहुतांश संसारांमध्ये वाद होतच आहेत. (Mobile has destroyed the privacy of husband and wife, Disputes are happening in most of the couples)
मात्र पुण्यात याच विषयाला नुसरून एक घटना घडली आहे. त्याला कारण ठरलं व्हॉट्सअॅपचा डीपी. माझ्या सगळ्या मैत्रिणींचे पती त्यांचा डीपीला ठेवतात. पण, माझा पती ठेवत नाही, अशी तक्रार घेऊन एक उच्चशिक्षित महिला पोलिसांकडे गेली. (Pune Police Bharosa Cell couples fight on Whatsapp DP)
महिलेने पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझा पती व्हॉट्सअॅपला माझा डीपी ठेवत नाही. म्हणून मी त्याच्यावर नाराज आहे.’ यावर त्या महिलेच्या पतीकडे याबाबत विचारणा केली. तो म्हणाला, ‘मी हिची सगळी काळजी घेतो. तिला जपतो. माझ्या मेहुणीच्या शिक्षणाचा खर्च उचलतो. सासूबाईंना आधार देतो. वयोमानानुसार काही दुखणी असेल, तर दवाखान्यात घेऊन जातो. तरी ही माझ्याशी तिचा डीपी मी माझ्या व्हॉट्सअॅपला का ठेवला नाही म्हणून सारखी चिडत असते. त्यावरून आमच्यात सतत भांडण होत राहतात. मी काय करावं हेच मला कळत नाही,” असं त्याने सांगितलं.
दरम्यान, दोघांमध्ये सातत्यानं वाद होत असल्यानं हे प्रकरण भरोसा सेलकडे आलं होतं. अखेर तोडगा निघाला आणि दोघेही आता पुन्हा आनंदाने नांदू लागले आहेत. त्या दोघांनाही समुपदेशन करून पुन्हा एकत्र आणण्यात आलं आहे हे मात्र छान झालं आहे. मात्र डिजिटल इंडियात नाती देखील डिजिटल झाली आहे हे मात्र नक्की असं या उदाहरणावरून बोलता येईल.
News English Summary: An incident has taken place in Pune on the same subject. The reason was the DP of WhatsApp. The husbands of all my girlfriends keep their DPs. But, a highly educated woman went to the police with a complaint that my husband was not keeping her.
News English Title: Pune Police Bharosa Cell couples fight on Whatsapp DP news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER