22 January 2025 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
x

BSNL Skylo Box | गावखेड्यात टॉवर नसतानाही मिळणार सुपर इंटरनेट आणि नेटवर्क

Skylo partners, BSNL, satellite based IoT Network, India

नवी दिल्ली, १२ डिसेंबर: दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर देशात एक कोटी डेटा सेंटर उघडण्यात येणार आहेत असं जाहीर करण्यात आलं. या योजनेला प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस योजना असं नाव देण्यात आलं असून त्यामुळे देशात वाय-फाय क्रांतीच होणार असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत देशात पब्लिक डेटा ऑफिस (PDO) उघडण्यात येणार आहेत. त्यासाठी लायसन्सची गरज पडणार नाही. कोणत्याही दुकानाचं डाटा ऑफिसमध्ये रुपांतर करता येऊ शकतं. सरकारकडून डाटा ऑफिस, डाटा अॅग्रिगेटर आणि अॅप सिस्टिम उघडण्यासाठी 7 दिवसात सेंटर उघडण्याची परवानगी दिली जाणार आहे.

त्यानंतर सरकारी मालकीच्या BSNL’ने देखील मोठा निर्णय जाहीर केला आहे. BSNL’ने आणखी एक बेस्ट सेवा आणून आपली पकड आणखी मजबूत करण्याची तयारी केली आहे. इतके सगळे ऐकून आपल्याला त्या भन्नाट अशा सेवेची उत्सुकता आणखी वाटत असेल नाही..! होय, आता यापुढे अगदी मोबाईल टॉवर किंवा ओएफसी केबल यांची जोडणी नसतानाही BSNL कंपनीची सेवा मिळणार आहे. थेट बेस्ट इंटरनेट कनेक्टीव्हिटी देण्याच्या या उपकरणाची घोषणा कंपनीने केली आहे.

उपग्रहाच्या मदतीने आईओटी नेटवर्क सेवा सुरू करण्यात आलेली आहे. अमेरिकेतील स्काइलो कंपनीच्या मदतीने जगातील अशी पहिलीच सॅटेलाईट (BSNL and Skylo IoT Network) आधारित इंटरनेट सेवा देण्याचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. याद्वारे अगदी कुठेही कॉल ड्रोप न होता सेवा अनुभवण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. दुर्गम जंगलात, समुद्रातील बेटावर किंवा अगदी कुठेही असे उपकरण नेऊन कनेक्टीव्हिटीमध्ये राहण्याची संधी कंपनीने दिली आहे.

केवळ 10 हजार रुपयांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स डिवाइस स्काइलो बॉक्स बसवून ग्राहकांना ही सेवा मिळणार आहे. याची माहिती कंपनीचे एमडी पी के पुरवार यांनी माध्यमांना दिली आहे. एकूणच सेवेच्या बाबतीत मागे पडल्याने ग्राहकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेली ही बलाढ्य सरकारी कंपनी पुन्हा एकदा यानिमित्ताने कात टाकीत असल्याचे दिसत आहे. दरम्यान याबाबत अधिकृत प्रेस रिलीज देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

 

News English Summary: Even without a mobile tower or OFC cable connection, BSNL will be available. The company has announced this device to provide the best direct internet connectivity. IoT network service has been launched with the help of satellite. It is the first such satellite-based internet service in the world with the help of Skylo in the US. This will give customers the opportunity to experience the service without having to drop a call anywhere. The company offers the opportunity to stay in connectivity with such equipment in remote forests, on an island in the sea or even anywhere. Customers will get this service by installing the Internet of Things device skylo box for only Rs 10,000. This information has been given to the media by the MD of the company PK Purwar.

News English Title: Skylo partners with BSNL to Launch Worlds first satellite based IoT Network in country India News updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x