22 November 2024 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

नियमांच्या आडून सोशल मीडिया कंपन्यांवर वचक? | कोरोना आपत्तीतील अपयशामुळे केंद्र अधिक सतर्क?

Twitter

नवी दिल्ली, २५ मे | देशात सुरू असलेल्या सोशल मिडिया कंपन्या अर्थात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. केंद्र सरकारने देशात कार्यरत असलेल्या सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी ३ महिन्यांची वेळही दिली होती. ही वेळ आता 26 मे रोजी पूर्ण होत आहे. मात्र, अद्याप कुठल्याही कंपनीने या नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे, 26 मेनंतर भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडिया साइट्स बंद होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 ला सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला होता. सोशल मीडिया कंपन्यांना भारतात, कंप्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि त्या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे अनिवार्य केले होते. यात, तक्रार निवारण, आक्षेपार्ह कंटेटवर लक्ष ठेवणे, कंप्लायंस रिपोर्ट आणि आक्षेपार्ह कंटेंट हटविणे आदी नियम आहेत.

सोशल मिडिया कंपन्यांना आपली वेबसाइट अथवा मोबाइल अॅपवर फिजिकल कॉन्टेक्स पर्सनची माहिती द्यावी लागेल, असेही या आदेशात म्हणण्यात आले होते. आतापर्यंत केवळ कू नावाची कंपनी वगळता इतर कुठल्याही कंपनीने यांपैकी कुठल्याही अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही.

आयटी अॅक्टच्या कलम 79 नुसार, त्यांना मध्यस्थ म्हणून लाइबलिटीपासून सूट मिळालेली आहे. परंतु त्यांतील बऱ्याच कंपन्या सामग्रीवर निर्णय घेत आहेत. यांत भारतीय राज्यघटना आणि कायद्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवे नियम 26 मे 2021 पासून लागू होत आहेत. जर या कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही, तर त्यांचे इंटरमीडिअरी स्टेटस काढून घेतले जाऊ शकते. त्या भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार, गुन्हेगारी कारवाईच्या चौकटीत येऊ शकतात.

 

News English Summary: The Ministry of Electronics and Information Technology of the Government of India had on February 25, 2021 given all social media companies three months to comply with the new rules. In India, social media companies were ordered to appoint compliance officers and nodal officers, all of whom were required to be based in India. These include grievance redressal, monitoring of objectionable content, compliance reports, and deletion of objectionable content.

News English Title: Social Media Guidelines will cease to operate in india from may 26 news updates.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x