5 February 2025 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
x

Space Tourist | अंतराळात फिरून आलेल्या व्यक्तीने सांगितला अनुभव, म्हणाला खरंच पृथ्वी स्वर्ग आहे, तिकडे फक्त भयाण अंधार

Space Tourist

Space Tourist |अंतराळात फिरता यावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न काही व्यक्तीच पूर्ण करु शकतात. सर्वसामान्य माणसाला हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. अशात विलिअम शॅटनर या ९० वर्षांच्या वृध्द आजोबांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. तसेच त्यांना आलेला अनुभव त्यांनी एका पुस्तकातून व्यक्त केला आहे. विलिअम शॅटनर हे बेजॉसच्या ब्लू ओरिजन या प्रकल्पातून अंतराळात गेले होते. ते आपल्या पुस्ताकात म्हटले आहे की, जेव्हा मी दुसरीकडे पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझा मृत्यू ऊभा होता.

ब्लू ओरिजनच्या न्यू शेपर्ड या स्पेसक्राफ्टमध्ये विलिअम शॅटनर यांच्या बरोबर अन्य तिन व्यक्ती होत्या. या प्रोजक्टेमध्ये अशी तरतुद आहे की, कोणतीही सामान्य व्यक्ती ठरावीक शुल्क भरुन १०० किलोमिटर ऊंच अंतरावर जाऊ शकते. एवढ्या उंचावर गुरुत्वाकर्शन फार कमी असते. त्यामुळे माणसाला निट ऊभे राहता येत नाही. सर्वत्र अंधार असतो. विलिअम शॅटनर यांच्या आधी वयोवृध्द असलेल्या एका ८२ वर्षीय वॅली फंक व्यक्तीने इथे जाण्याचा रेकॉर्ड केला होता. त्यानंतर ९० वर्षीय विलिअम शॅटनर यांनी १० मिनटे तेथे थांबून हा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

विलिअम शॅटनर यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, जेव्हा आम्ही अंतराळात जात होतो तेव्हा फार खूश होतो. मोठा गाजावाजा करत आम्ही वरती जात होतो. थोड्या वेळाणे मागे पाहिले तर अंधार झाला होता. आमच्याबरोबर एक डिवाइज होते. यातून आम्ही किती गुरुत्वाकर्शनात आहोत हे समजत होते. जेव्हा Gs3 झाले तेव्हा माझे तोंड सीटच्या आत घुसत आहे की काय असे मला वाटले. Gs2 वर मी हात उचलण्याचा प्रयत्न केला. पण मला काही जमेना. थोड्यावेळाने Gs2 शून्य झाले तेव्हा मी आता काही जगत नाही असे मला वाटले. तेथील वातावरण मला सहन होत नव्हते.

आपल्या पुस्तकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, वरती गेल्यावर खाली पाहिले असता पृथ्वी निट पाहता येत नव्हती. कारण खूप अंधार होता. तो अंधार इतका भयानक होता की, काहीच पाहणे कठीण होते. जेव्हा मी पुन्हा खाली पाहिले तेव्हा ढग, निळे पाणी आणि आपली पृथ्वीचे दिसलेले दृश्य विस्मरणीय आहे. यामुळे मला समजले की पृथ्वीला आई का म्हणतात. आपण आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे. असे ते म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Story Oldest space tourist William Shatner shares experience after touring blue origin check details 24 October 2022.

हॅशटॅग्स

Space Tourist(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x