28 January 2025 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्सनल वेबसाईटचे ट्विटर अकाऊंट हॅक

Twitter Account Of PM Narendra Modi, Hacked, Marathi News LIVE, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ३ सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हे अकाऊंट मोदींच्या पर्सनल वेबसाईटशी संलग्न आहे. याबाबत कंपनीला कल्पना आली असून अकाऊंट सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने कंपनीने पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे, अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली आहे. मोदींच्या ट्विटर अकाऊंटला 2.5 मिलियन्स पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटरवर अकाऊंट आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाईटचं ट्विटरवर narendramodi_in नावानं अकाऊंट आहे. हे अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची घटना घडली.

पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅकरनं हॅक केलं. त्यानंतर क्रिप्टो करन्सीसंदर्भातील ट्विट केले गेले. एक ट्विट करण्यात आलं की, मी सगळ्यांना आवाहन करतो की, कोविड-१९ साठी बनवण्यात आलेल्या पीएम रिलीफ फंडाला मदत करा. हॅकरनं पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, कोविड-१९साठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर फंडाला उदारपणे देणगी द्यावी, असं आवाहन मी करतो. आता भारतात क्रिप्टो चलनाला करन्सी सुरूवात होतोय. कृपया देणगी म्हणून बिटक्वाईन दान करावे. -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत ट्विट,” असं पहिलं ट्विट करण्यात आलं.

तत्पूर्वी जुलै महिन्यामध्ये अनेक प्रमुख व्यक्तींचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. यात बिल गेट्स, एलोन मस्क, मायकेल ब्लूमबर्ग आणि अॅपल यांचा समावेश होता. यांच्या हॅक झालेल्या अकाऊंटवर बिटकॉइन घोटाळ्यासंबंधित मेसेजेस पाहायला मिळाले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जो बिडेन, कान्ये वेस्ट, किम कर्दाशिअन वेस्ट, वॉरेन बफे, जेफ बेझोस आणि अमेरिकेतील कित्येक प्रसिद्ध व्यक्तींचे व्हेरिफाईड अकाऊंट क्रिप्टोकरन्सी स्कॅममध्ये हॅक झाले होते.

 

News English Summary: Micro blogging site Twitter on Thursday confirmed that a page which is linked to an account of Prime Minister Narendra Modi’s personal website was hacked. While it did not specify the details of the hacking, a report by news agency Reuters said a series of tweets asking followers of the page to donate to a relief fund through cryptocurrency were put out.

News English Title: Twitter Account Of Prime Minister Narendra Modi Personal Website Hacked Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x