22 January 2025 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

IT नियमांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपुष्टात येईल, आमच्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेस धोका - ट्विटर

Twitter

नवी दिल्ली , २७ मे | टूलकिट वाद आणि सोशल मीडियाच्या नवीन मार्गदर्शक सुचनांविषयी ट्विटर आपले मौन सोडले आहे. सोशल मीडिया कंपनी ट्विटरने केंद्र सरकारकडून नवीन गाइडलाईन लागू करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मागितला आहे. या नवीन आयटी नियमांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र धोक्यात येत असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अलीकडे, कंपनी दिल्ली आणि गुडगाव येथील ट्विटर कार्यालयांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल देखील चिंतेत आहे. कंपनीने पुढे म्हटले की, अशा कारवाईमुळे आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेस धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्विटरने या मुद्द्यांवर दिली प्रतिक्रिया:

  1. ट्विटरने दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे आमच्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेस धोका आहे. आमच्या ग्राहकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलदेखील आम्ही काळजीत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. तथापि, ट्विटरने थेट दिल्ली पोलिसांचे नाव न घेता भारतासह जगाभरातील पोलिसांच्या धमकी देणारी प्रवृत्तीबद्दल चिंतेत असल्याचे सांगितले आहे.
  2. केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाईनला लागू करणार असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. परंतु, ते पारदर्शकतेच्या तत्त्वांसह परिपूर्ण असायला हवे. त्यासोबतच संबंधित प्रकरणात भारत सरकारशी सतत चर्चा सुरु ठेवणार आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी 3 महिन्यांचा अवधी ट्विटरने मागितला आहे.
  3. केंद्र सरकारने या मार्गदर्शक सूचनांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतात पदवीधर अधिकारी नेमण्यास सांगितले आहे. परंतु, यावर याबाबत आम्ही चिंतेत असून यामुळे प्लॅटफॉर्मवरील सामग्रीसाठी ग्रेवांस अधिकारी जबाबदार असतील. या नियमांमुळे ही पोहोच धोकादायक पातळीवर जाईल असे ट्विटरने सांगितले.
  4. आम्ही भारतीय जनतेसाठी वचनबद्ध असून आमची सेवा भारतातील संवादासाठी एक प्रभावी साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोनाकाळात आमची सेवा ही प्रमुख आधार स्त्रोत बनली आहे. ट्विटरने पुढे म्हटले की, भारत देशात आमची सेवा पूर्ववत सुरु ठेवण्याकरीता आम्ही हे आयटी नियम लागू करण्याचा प्रयत्न करु. त्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करताना, आम्ही पारदर्शकता, अभिव्यक्तीची मजबुती, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या संरक्षणाची संपूर्ण काळजी घेणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 

News English Summary: Twitter has broken its silence on toolkit controversy and new social media guidelines. Social media company Twitter has asked the central government for a three-month period to implement the new guidelines. Concerns have been raised that freedom of expression is being threatened by these new IT regulations.

News English Title: Twitter manipulated media tag controversy BJP spokesperson Sambit Patra Delhi police news updates.

हॅशटॅग्स

#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x