अत्यंत महत्वाचं | आधार कार्ड संबंधित या २ विशेष ऑनलाईन सेवा बंद | वाचा अन्यथा आयत्यावेळी गोंधळ होईल

नवी दिल्ली, ०७ जुलै | जर तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करायचे आहे, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. यूआयडीएआयने (UIDAI) आधारशी संबंधित दोन विशेष सेवा बंद केल्या आहेत. तुम्ही त्याभरवसे राहाल आणि आयत्यावेळी तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता असल्याने आधी खाली दिलेली माहिती लक्षात ठेवा;
1. पत्ता पडताळणी पत्र (Address Validation Letter):
पुढील आदेश येईपर्यंत यूआयडीएआयने अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे आधार अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. भाडेकरू किंवा इतर आधार कार्डधारक याद्वारे आपला पत्ता सहजपणे अपडेट करू शकत होते. यूआयडीएआयने आपल्या वेबसाइटवरून अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरशी संबंधित पर्यायही काढून टाकला आहे.
यूआयडीएआयने यासंदर्भात मीडियाला सांगितले की, आधार कार्डधारक अपडेशन करण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकतात. इतर व्हॅलिड अॅड्रेस प्रूफची यादी (https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf) या कोणत्याही एका अॅड्रेस प्रूफच्या माध्यमातून आपला पत्ता अपडेट करू शकतात.
काय होणार याचा परिणाम?
भाड्याने राहणाऱ्या लोकांवर याचा परिणाम होईल. आधार कार्डचा पत्ता अपडेट करण्यात या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त, ज्या लोकांकडे पत्ता दुरुस्त करण्यासाठी कोणतेही डॉक्युमेंट (दस्तऐवज) नाहीत, त्यांनादेखील अडचणी येऊ शकतात.
2. आधार कार्ड रीप्रिंट सेवा बंद (Aadhaar Card Reprint):
याशिवाय, यूआयडीएआयने जुन्या शैलीत Aadhaar Card Reprint ची सेवाही बंद केली आहे. पूर्वी यूआयडीएआय लांब-रुंद आधार कार्ड जारी करत होते आणि त्याला रिप्रिंट करण्याची सुविधा देखील प्रदान करीत होते. परंतु आता त्याऐवजी ते प्लास्टिकचे पीव्हीसी कार्ड (PVC Card) जारी करत आहे. या कार्डचा आकार डेबिट कार्डसारखा आहे. हे सहजपणे खिशात आणि पाकीटात ठेवता येऊ शकते. यामुळे यूआयडीएआयने जुन्या शैलीचे आधार कार्ड बंद केले आहे.
ट्विटरवर एका युजर्सच्या प्रश्नाला उत्तर देताना आधार मदत केंद्राने (Aadhaar Help Centre) ट्विट केले की, “प्रिय रहिवासी, Order Aadhaar Reprint सेवा Discontinue करण्यात आली आहे. त्याऐवजी तुम्ही Aadhaar PVC Card ला Online मागवू शकता. याचबरोबर, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही E-Aadhaar चे प्रिंट आउटही घेऊ शकता आणि कागदाच्या स्वरुपातही ठेवू शकता.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: UIDAI shut down Aadhaar card related address validation letter and reprint online services news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल